Tarun Bharat

बर्ड फ्लू ची धास्ती कायम

प्रतिनिधी/ सातारा

 कोरोना जातो-ना-जातो तोवर आता बर्ड फ्लू ने थैमान घालण्यास सुरूवात केली  आहे. जिल्हय़ात आत्तापर्यंत 172 पक्षी दगावले असुन त्यामध्ये 8 कावळे, 1 बगळा व उर्वतीत कोंबडय़ा आहेत. यामधील 24 मृत पक्षांचे नमुने हे चाचणी करीता पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल लवकच येणार असुन त्यानंतर हे पक्षी बर्ड फ्लू दगावलेत की कोणत्या अन्य आजाराने याचा निकष लागणार आहे.

Advertisements

 सातारा जिल्हय़ातुन हे मृत पक्षी प्रारंभी पुणे येथील पशुसंवर्धन रोग चाचणी विभागाकडे पठविण्यात आले. त्यानंतर ते भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थांकडे पाठविण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता हा रोग परदेशी स्थलांतरित पक्षांमुळे येत असल्याचे निकषात येत आहे. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका अध्याप कायम आहे.

 सध्या बर्ड फ्लू ने इतर राज्यात घालतलेला थैमान पाहुन महसुल, वन आणि पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. मृत पक्षांची शोधमोहीम राबविण्यासाठी तालुकानिहाय ‘फ्लाईंग स्कॉड’ गठित करण्यात आले आहेत. त्यानुसार वनधिकाऱयांनी जंगल, व्याघ्र प्रकल्पात फिल्डवरील कार्यरत कर्मचाऱयांना जलाशय, तालावावर परदेशी अथवा स्थानिक पक्षांवर लक्ष ठेवण्याबाबत सजग केले आहे. मृत पक्षी अढळल्यास त्याचे नमुने घेताना काळजी घ्यावी, पशुसंवर्धन विभागाला अवगत करूनच घटनास्थळी पंचनामा करावा, शासनाने पत्रकाद्वारे कळविले आहे.

 अत्तापर्यंत नऱहाचीवाडी-खंडाळा, हणबर-कऱहाड, बिदाल, हिंगली-माण आदी भागात हे मृत पक्षी सापडले आहेत. या बर्ड फ्लूच्या धास्तीने कित्तेक खवय्यांनी चिकन कडे पाठ विफरविली आहे. त्यामुळे दरात देखिल घसरण झाली आहे. सध्या चिकन 140 रूपये प्रती किलो दराने विक्री करण्यात येत आहे. तर अडय़ांचा दर 435 रूपये शेकडा इतका झाला आहे.

 या बर्ड फ्लू च्या धास्तीने चिकन खाणाऱयांचे प्रमाण कमी झाले असल्याने कित्तेक मांसाहारी हॉटेल व चायनीज फूड विक्रेत्यांवर संक्रांतीची वेळ आली आहे. तसेच पोट्री व्यवसायीक देखिल चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे या बर्ड फ्लू चा धोका लवकरात लवकर टळावा अशी अशा विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

datta jadhav

रयत शिक्षण संस्था देशाचे भूषण

Patil_p

साताऱयाची होणार ‘जीआयएस मॅपिंग’

Amit Kulkarni

बीडमध्ये मराठ्यांचा संघर्ष मोर्चा

Abhijeet Shinde

वर्धा : उत्तम गलवा कंपनीत भीषण स्फोट; 30 पेक्षा अधिक मजूर जखमी

Rohan_P

पूरनियंत्रण सोडण्यात येणारे पाणी माण-खटावला द्यावे

Patil_p
error: Content is protected !!