Tarun Bharat

बऱयाच महिन्यांनी शनिवारची बाजारपेठ बहरली

विकेंड कर्फ्यु रद्दमुळे दिलासा, विविध साहित्यांनी नटली बाजारपेठ

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका तज्ञांनी वर्तविला आहे. मात्र सध्या बेळगावकरांना कोरोनाबाबत दिलासा मिळत असून रुग्ण संख्याही घटत आहे. मात्र हा धोका टाळण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. सध्या गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ सजली आहे. वेगवेगळय़ा साहित्यांची रेलचेल बाजारपेठेत दिसत आहे. ते साहित्य खरेदी करण्यासाठी शनिवारी एकच गर्दी उसळली होती. बाजाराचा दिवस आणि त्यातच विकेंड कर्फ्यु रद्द करण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली.

गणेशोत्सवासाठी बाजारपेठ फुलांनी बहरतेय. आपल्या लाडक्मया गणरायाच्या आगमनासाठी जास्वंद, कमळ, शेवंती, गुलाब, झेंडू या फुलांना मागणी वाढत आहे. गणेशोत्सवात ग्रामीण भागाबरोबरच इतर राज्यातूनही बाजारपेठेत फुलांचा दरवळ असतो. यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसते. यामुळे सध्या बाजारपेठेत गणेशरायांच्या आगमनाच्या तयारीसाठी नानाविध फुलांनी बाजारपेठ सजली आहे.

गणेश देवता ही विद्येची देवता मानली जाते. यामुळे गणेशोत्सव काळात सलग अकरा दिवस गणेशाची विधीवत पूजा, अर्चा केली जाते. यामुळे अकरा दिवस पूजा करण्यासाठी बाजारपेठेत पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. पुजेच्या साहित्यामध्ये कापसाचे वस्त्र, वाती, अगरबत्ती, धूप, कापूर, शेंदूर, हळद, कुंकू, अष्टगंध, नाडापुडी आदी साहित्याला मागणी वाढली आहे. 

गणेशोत्सव आला की साऱयांना वेध लागतात ते सजावटीच्या साहित्याचे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासूनच विविध आकर्षक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. मागील काही दिवसांपासून खरेदीत मंदी म्हणणाऱया दुकानदारांना मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होतानाचे चित्र दिसतेय. यावषी सजावटीच्या साहित्यावर चायनिज वस्तूंचे अधिराज्य नाही. कारण भारतीय साहित्यावर नागरिक अधिक भर देत आहेत.

सजावटीच्या साहित्यामध्ये आकर्षक असे मखर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या मखरांमध्ये राजवाडे, सिंहासन, मंदिरे, पाळणे असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. याबरोबरच विद्युत रोषणाईमध्ये एलईडी बल्बचाच यावषी बोलबाला पहायला मिळत आहे. प्लास्टीकच्या वेली, माळा, पडदे, विविध आकारातील फोकस बल्ब, विद्युत माळा असे नानाविध प्रकारचे साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. याचबरोबर काहींनी थर्मोकॉल खरेदी करुन स्वतःच घरी सजावट करण्यावरही भर दिला आहे.

फुलांबरोबरच गणेशोत्सवानिमित्त फळांच्या मागणीतही वाढ होते. आणखी पाच दिवसांवर येवून ठेपलेल्या गणरायांच्या आगमनासाठी सारे शहर आणि परिसर कामाला लागले आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे तरुणाई आपल्या स्वतःच्या घरातच आता आकर्षक अशी सजावट करुन त्याचा आनंद घेण्यासाठी धडपडत आहेत.

बाजारपेठेत फळांच्या विक्रीतही वाढ होताना दिसत आहे. गणेशमूर्तीसमोर पाच फळे ठेवण्याचा प्रघात असल्याने विविध प्रकारची फळे घेण्यावरही भर देण्यात येत आहे. याबरोबरीनेच सफरचंद, डाळींब, पेरु, चिकू, सीताफळ, केळी आदी फळाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे होलसेल विपेत्यांनी आतापासूनच याचा साठा करण्यावर भर दिला आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये किरकोळ विपेते ही सर्वच फळे मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्याची शक्मयता आहे.

आपल्या लाडक्मया गणरायासाठी एक तरी नवा दागिने आणावा, या श्रध्देतून अनेक भक्तगण चांदी व सोन्याची आभूषणे खरेदी करत असतात. काहीजण चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे शहरातील बेळगाव व शहापूर येथील सराफी पेढय़ांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

कोरोनाचे सावट कायम

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीला साऱयांनाच तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे उद्योग-धंदे, लहान मोठे व्यवसायांवर मंदी आली आहे. याचबरोबर अनेक जण बेरोजगारही झाले आहेत. त्यामुळे या गणेश चतुर्थीच्या सणावरही कोरोनाचे सावट कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. आर्थिक चक्रच कोलमडले असल्यामुळे हौसेला मुरड घालावी लागत आहे. असे असले तरी मोठय़ा उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी धडपड सुरू आहे.

Related Stories

निपाणीत सुलभ भगवत गीता प्रकाशन सोहळा

Patil_p

परराज्यांतून आतापर्यंत 1530 नागरिक बेळगावात

Patil_p

अन्यथा, तीन दिवसाआधीच मुडदा!

Amit Kulkarni

पंचायतराज अभियंते विभागाचा मनमानी कारभार

Amit Kulkarni

ज्येष्ठ सर्वोदयी नेते, माजी आमदार सदाशिवराव भोसले यांचे निधन

Omkar B

पीक विमा योजनेची मुदत 31 जुलैपर्यंत

Amit Kulkarni