Tarun Bharat

बलवीर सिंग सिनियर यांना हार्ट ऍटॅक, प्रकृती चिंताजनक

Advertisements

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचे माजी हॉकी ऑलिंपिकपटू आणि कर्णधार बलवीर सिंग सिनियर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आले आहे. 96 वर्षीय बलवीर सिंग सिनियर यांना मंगळवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे.

गेल्या शुक्रवारी बलवीर सिंग सिनियर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना श्वसनाचा त्रास होवू लागला. मोहालीतील एका खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना 48 तासांच्या कालावधीसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे त्यांचा नातू कबीरने सांगितले.

भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये बलवीर सिंग सिनियर यांची कामगिरी अविस्मणीय म्हणून नोंदविली गेली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने आधुनिक ऑलिंपिक इतिहासामध्ये निवडण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील 16 ऍथलीटस्मध्ये बलवीर सिंग सिनियर यांचा समावेश केला आहे. 1957 साली बलवीर सिंग सिनियर यांचा भारत शासनातर्फे पद्मश्री पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता. तसेच 1975 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया भारतीय संघाचे हे व्यवस्थापक होते. 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने हॉलंडचा 6-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. या सामन्यात भारतातर्फे बलवीर सिंग सिनियर यांनी पाच गोल नोंदविले होते.

Related Stories

भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना आज

Nilkanth Sonar

एक सामना नव्हे, वर्ल्डकप जिंकणे हे आपले लक्ष्य!

Patil_p

भारताच्या विजयात शुभमनचे झुंजार शतक

Patil_p

हेन्स, बाबर आझम मार्चमधील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

प्रसिद्ध कृष्णा, टीम सेफर्ट कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

ओडिशा एफसी संघाशीबोडो, प्रेमजीत सिंग करारबद्ध

Patil_p
error: Content is protected !!