Tarun Bharat

बलात्काराच्या आरोपाखाली ‘या’ माजी मंत्र्याला अटक

Advertisements

ऑनलाईन टीम

बलात्काराच्या आरोपाखाली AIADMKच्या एका माजी मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. चेन्नई शहर पोलिसांनी एआयएडीएमकेचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना बंगळूरमधून याप्रकरणी अटक केली. मलेशियन महिलेवर बलात्कार, गर्भपात आणि धमकी दिल्याचा आरोप मनिकंदन यांच्यावर आहे.

प्रकरण वाढत असल्याचे पाहून मनिकंदन यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. तेव्हापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर रविवारी पोलिसांनी त्यांना अटक केली.

“हे प्रकरण एका माजी मंत्र्याने केलेल्या कथित गुन्ह्याशी संबंधित आहे, जे गंभीर स्वरूपाचे आहे आणि तक्रार नोंदविण्यास योग्य आहे. याचिकाकर्त्याकडून माहिती गोळा करण्यासाठी ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. जामीन मंजूर झाल्यास, तो तपास टाळण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करू शकेल” असे न्यायालयाने म्हटले आहे.

मणिकंदन यांची मे २०१७ मध्ये मलेशियन अभिनेत्रीशी ओळख झाली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तत्कालीन मंत्र्यांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मलेशियन अभिनेत्रीशी लग्न करण्याची विनंती केली होती. फिर्यादीत म्हटले आहे की आरोपीने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले आणि जबरदस्तीने आणि क्रूर रीतीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.

Related Stories

गुणवत्तेसोबत आरक्षणही आवश्यक

Amit Kulkarni

संकटं कितीही येवोत, महाराष्ट्र कधीही झुकणार नाही – अजित पवार

Abhijeet Shinde

देशात 20,021 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

स्वयंचलित मेट्रो सेवेचा दिल्लीत शुभारंभ

Patil_p

भोपाळमध्ये आयएएस अधिकाऱयाला लागण

Patil_p

शेतकऱ्यांच्या ट्रक्टर मोर्चाला अनुमती

Patil_p
error: Content is protected !!