Tarun Bharat

बलात्काऱयाला पकडू अन् चकमकीत ठार करू!

तेलंगणाच्या मंत्र्याची घोषणा – 6 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् हत्या

वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणाचे कामगारमंत्री मल्ला रेड्डी यांच्या एका वक्तव्याने सर्वांना चकित केले आहे. रेड्डी यांनी बलात्काराच्या आरोपीला चकमकीत ठार करण्याची घोषणा जाहीरपणे केली आहे. मेडचल-मलकाजगिरि जिल्हय़ात एका कार्यक्रमात सामील रेड्डी यांना 6 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी विचारणा करण्यात आली होती.

बलात्कार करणाऱया 30 वर्षीय आरोपीला अवश्य पकडले जाईल आणि त्याला चकमकीत ठार करण्यात येईल. त्याला सोडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी याप्रकरणाची सुनावणी जलद होईल. आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटू आणि मदत करू असे रेड्डी यांनी म्हटले आहे. रेड्डीच नव्हे तर मलकाजगिरिच्या काँग्रेस खासदारांनीही आरोपीचा चकमकीत खात्मा करावा असे म्हटले होते.

शेजाऱयावर बलात्कार अन् हत्येचा आरोप

मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या 9 सप्टेंबर रोजी झाली होती. तिचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. याप्रकरणी शेजारी राहणारा एक व्यक्ती आरोपी आहे. तेलंगणा पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी 15 पथके स्थापन केली असून ती महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपीविषयी माहिती देणाऱयास 10 लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली होती.

Related Stories

बिहारच्या लपवा-छपवीने मृत्यूसंख्येचा विस्फोट

Amit Kulkarni

नव्या निवडणुका जाहीर करू नका

Patil_p

मायावतींकडून पुन्हा ब्राह्मणकार्ड

Patil_p

कारचे दर होणार 30 टक्केपर्यंत स्वस्त

Patil_p

राजस्थानमध्ये कोरोना बाधितांची संख्या 16,296 वर

Tousif Mujawar

जेवढा PF, तेवढीच पेन्शन!

datta jadhav