बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे धर्मासाठीचे बलिदान तरुणांना समजावे या हेतूने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बलिदान मास आचरणात आणला जातो. बलिदान मासची सांगता सोमवार दि. 12 रोजी होणार आहे. तत्पूर्वी धर्मवीर ज्वालेचे बेळगावमध्ये आगमण झाले असून तालुक्मयातील प्रत्येक गाव, विभाग यांनी ही ज्वाला रविवार दि. 11 रोजी सकाळी 6.30 ते सायंकाळपर्यंत घेऊन जायची आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. याची आठवण म्हणून धारकरी एक महिना बलिदान मास आचरणात आणतात. या महिन्यात एखादी आवडती वस्तू किंवा पदार्थ वर्ज केला जातो. तसेच काहीजण मुंडणही करून घेतात. या बलिदान मासची सांगता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी केली जाते. सोमवार दि. 12 रोजी बलिदान मासची सांगता होणार आहे. सकाळी 6.30 वा. छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा मूकपद्धतीने काढली जाणार आहे. कपिलेश्वर रोड, हेमू कलानी चौकमार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्तीसमोर ही ज्वाला विधिवत पूजन करून शांत केली जाणार आहे. यावेळी सर्व शिवभक्तांना व धारकऱयांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले आहे.


previous post