Tarun Bharat

‘बलिदान मास’ शुक्रवारी सांगता

शहरात काढण्यात येणार मूक पदयात्रा

प्रतिनिधी /बेळगाव

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (3 मार्च ते 1 एप्रिल) या दरम्यान धर्मवीर बलिदान मास आचरण्यात येत आहे. या बलिदान मासाची सांगता शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी होणार आहे. संभाजी महाराजांच्या नशिबी अंत्ययात्रा आली नव्हती, या स्मृतीप्रित्यर्थ सकाळी 6.30 वा. छत्रपती शिवाजी उद्यान येथून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत मूक पदयात्रा काढली जाणार आहे. संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून आणण्यात आलेली धर्मवीर ज्वाला विधिवतपणे पूजन करून शांत केली जाणार आहे.

औरंगजेबने दगा फटका करत संभाजी महाराजांना ताब्यात घेतले. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावास्येपर्यंत त्यांचे एक-एक अवयव काढण्यात आले. संभाजी महाराजांनी सर्व अत्याचार सहन केले. परंतु धर्माभिमान जाऊ दिला नाही. अखेर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले. संभाजी महाराजांनी धर्माभिमानासाठी केलेला त्याग आजच्या पिढीला समजावा, यासाठी बलिदान मास पाळला जातो. बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागात गावोगावी, गल्लोगल्ली बलिदानमास आचरणात आणला गेला.

गुरुवार दि. 31 रोजी सकाळी 7 वा. गोवा व सिंधुदुर्ग येथे धर्मवीर ज्वाला घेऊन जाण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वा. छत्रपती शिवाजी उद्यान येथून तालुक्मयाच्या प्रत्येक गावात धर्मवीर ज्वाला घेऊन जाण्यात येणार आहे. यावेळी तसेच मूक पदयात्रेवेळी प्रत्येक गावप्रमुख, गल्लीप्रमुख, विभाग प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.

Related Stories

धर्मांतर बंदी विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग

Amit Kulkarni

चक्क पेट्रोलपंपातून गाडय़ांमध्ये भरण्यात आले पाणी…

Amit Kulkarni

एसडीएम, जिमखाना, हुबळी स्पोर्ट्स क्लब विजयी

Amit Kulkarni

निवडणूक जाहिरातींवर लक्ष देण्याची जिल्हाधिकाऱयांची सूचना माहिती-प्रसारण विभागाला दिली भेट

Omkar B

बेळगाव प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni

वृत्तपत्र विक्रेता दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा करणार

Amit Kulkarni