Tarun Bharat

बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; 14 ठार

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ग्वादर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला लक्ष्य करून दहशतवाद्यांनीकेलेल्या गोळीबारात 7 सैनिकांसह एकूण 14 जण ठार झाले आहेत.

निम्नलष्करी पथक आणि ग्वादर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पथक कराचीकडे जाणार असल्याची माहिती दहशतवाद्यांना होती. त्यामुळे दहशतवादी बलुचिस्तानमधील ओरामाराच्या डोंगरावर दबा धरून बसले होते. तेथून त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा मुकाबला करत ग्वादर कंपनीच्या पथकला सुरक्षितस्थळी पोहचवले. 

दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार करण्यात आला. यात सात सैनिकांसह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने तेल कंपनीला कोणताही धोका पोहचला नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सुरक्षा दलाने या परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

त्वचा घासल्यावर शरीरातून येतो सुगंध

Patil_p

फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील आंदोलन स्थगित

datta jadhav

कार पार्किंगमध्ये वॉर्ड

Patil_p

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी युक्रेन दौऱयावर

Patil_p

कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा; जिल्हयात दिवसभरात 1696 रुग्ण निगेटिव्ह

Archana Banage

बारावीनंतर करिअर निवडतायं, ‘या’ बेसिक गोष्टीची होईल मदत; वाचा सविस्तर

Archana Banage