Tarun Bharat

बलूचिस्तानची राजधानी क्वेटा स्फोटाने हादरली

3 सुरक्षारक्षकांचा मृत्यू – 20 जण जखमी

वृत्तसंस्था/ क्वेटा

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामध्ये रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात कमीत कमी 3 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. ही घटना मास्टंग रोडवर झाली असून याची पुष्टी क्वेटाच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे. जखमींना शेख जैद रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या स्फोटाची अद्याप कुठल्याच संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. तपास अधिकारी या स्फोटाला आत्मघाती हल्ला मानत आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हा स्फोट प्रंटियर कॉर्प्सच्या वाहनाला लक्ष्य करत घडवून आणला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटाकरता 5 किलो वजनाच्या स्फोटक सामग्रीचा वापर झाल्याची शक्यता पोलीस अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी क्वेटाच्या प्रसिद्ध सेरेना हॉटेलनजीक झालेल्या स्फोटात 8 जण जखमी झाले होते. तर 22 एप्रिल रोजी याच हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या चिनी राजदूतांना लक्ष्य करत हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्याच्या अखेरीस क्वेटाच्या गंजी भागात झालेल्या स्फोटात 4 जण जखमी झाले होते. प्रंटियर कॉर्प्सच्या एका वाहनाचे नुकसान झाले होते.

Related Stories

हृदयरोगांचा पत्ता लागणार डोळय़ांच्या तपासणीतून

Patil_p

ऑस्ट्रेलियात डेल्टा व्हेरियंटचा फैलाव

Patil_p

पाकने केली जे-10 सी विमानांची खरेदी; खासदाराकडून मात्र राफेलचे कौतुक

datta jadhav

तालिबानला मान्यता मिळवून देण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान

Patil_p

भारताशी सहकार्य बळकट करणार

Patil_p

नीरव मोदीच्या जीवाला भारतात धोका

Patil_p