Tarun Bharat

बळ्ळारीत सुरू होणार ‘स्कूल ऑफ मायनिंग’

Advertisements

खाणमंत्री मुरुगेश निराणी यांची माहिती : 50 एकर जागा देणार

प्रतिनिधी /बेंगळूर

खाणींचे व्यवस्थापन, खाण मालकांना प्रशिक्षण आणि भविष्यात उद्भवणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी बळ्ळारीत ‘स्कूल ऑफ मायनिंग’ सुरू करण्यात येईल, अशी माहिती खाण आणि भू-विज्ञानमंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. या प्रशिक्षण संस्थेसाठी 50 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सोमवारी तुमकूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खात्याशी संबंधीत प्रगती आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बळ्ळारी स्थापन होणारी स्कूल ऑफ मायनिंग ही खाण उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण देणारी देशातील दुसरी संस्था असेल. यासाठी बळ्ळारीत 50 एकर जमीन उपलब्ध केली जाणार आहे. अलीकडेच यासंबंधीचा विस्तृत आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लवकरच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्कूल ऑफ मायनिंग स्थापनेच्या निर्णयाला मंजुरी मिळविण्यात येईल. खाण आणि भू-विज्ञान खात्याचे कर्मचारी, खाण मालक आणि खाणींमधील कामगारांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था येथे केली जाणार आहे. अवैज्ञानिक पद्धतीने होणारे खाण व्यवसाय रोखण्याबरोबरच  सर्व प्रकारच्या खाणींविषयी प्रशिक्षण सुरू करण्यात येईल.

मायनिंग ऑपरेटींग आणि उद्योजकांना वैज्ञानिक पद्धतीने खाणी कोणत्या पद्धतीने चालवाव्यात, याची माहिती देणे हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मंत्री निराणी यांनी
सांगितले.

पाच ठिकाणी खाण अदालत

प्रत्येक जिल्हय़ात खात्याच्यावतीने नवनव्या योजना आखल्या जात आहेत. राज्यातील चार महसूल विभागांसह पाच ठिकाणी खाण अदालत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे खाण उद्योजकांना खाणींच्या परवान्यासंबंधी अर्ज घेऊन येरझाऱया  घालाव्या लागणार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

एक खिडकी योजना लवकरच

सिंगल विंडो (एक खिडकी) योजना लवकरच जारी करण्यात येईल. लहान-लहान उद्योजकांना एका खात्याकडून दुसऱया खात्याच्या कार्यालयात फिरावे लागू नये यासाठी ही योजना अनुकूल ठरणार आहे. सिंगल विंडो योजनेंतर्गत खाण-भूविज्ञान खात्याशी संबंधीत सर्व परवाने किंवा समस्या एकाच ठिकाणी निकाली काढणे शक्य होईल, असेही मुरुगेश निरणी यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटक: ‘या’ १५ जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त

Abhijeet Shinde

आरक्षणाच्या मागण्यांसाठी नेमलेली समिती व्यर्थ असल्याची भाजप आमदाराची टीका

Abhijeet Shinde

मोफत वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी

Amit Kulkarni

चार महिन्यांपासून शाळा बंद, शिक्षणतज्ञांना शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती

Rohan_P

पंतप्रधानांची कर्नाटक, पंजाब, बिहार आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा

Abhijeet Shinde

कर्नाटक : या कारणासाठी पोलिसांनी मुनावर फारुकीच्या शोला नाकारली परवानगी

Sumit Tambekar
error: Content is protected !!