Tarun Bharat

बळ्ळारी नाल्यापर्यंतच्या ‘त्या’ कालव्याचे काम मजुरांकडूनच

बेळगाव शेतकरी संघटनेने घेतला पुढाकार

प्रतिनिधी /बेळगाव

किल्ला खंदकापासून बळ्ळारी नाल्यापर्यंत जोडणाऱया कालव्यातील गवत व झाडे झुडपे मनुष्यबळाने काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालव्याच्या पूर्वेकडील बाजूने सफाईला सुरुवात करण्यात आली. बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले. सध्या पावसाळा असल्यामुळे मजूर लावूनच हे काम केले जात आहे.

या कालव्यामध्ये गांधीनगर येथील सांडपाणी सोडण्यात आल्याने त्या कालव्यामध्ये उतरणे अवघड झाले आहे. या खंदकाचे पाणी बळ्ळारी नाल्याला जात आहे. मात्र कालवा बुजून गेल्यामुळे शिवारात पाणी जाऊन शेतीचे नुकसान होत आहे. या नाल्याची खोदाई करावी, यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी पाठपुरावा केला होता.

सध्या पावसाळा असल्यामुळे मजूर लावून हे काम केले जात आहे. आता पाऊस कमी झाल्यास यंत्राच्या साहाय्याने हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी नारायण सावंत, सुनील जाधव, सुनील खन्नूकर, उमेश पाटील, लक्ष्मण मन्नोळकर, राहुल मोरे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

मोहन मोरे इलेव्हन- अलोन मुंबई अंतिम लढत आज

Patil_p

अगसगे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी चन्नम्मा भरमा तिरमाळे

Amit Kulkarni

कागवाड येथे नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

Patil_p

माजी आमदार अरविंद पाटलांवर शुभेच्छांचा वर्षाव

Amit Kulkarni

बेकिनकेरेत नागनाथ सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Omkar B

रेल्वे तिकीट काऊंटर काही तासच सुरू

Amit Kulkarni