Tarun Bharat

बसणीतील श्री महालक्ष्मीला सोनेरी किरणांचा अभिषेक

Advertisements

प्राचीन मंदिरात ग्रामस्थांनी प्रथमच अनुभवला किरणोत्सव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या बसणी येथील पंचतत्व देवस्थान श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी तेथील ग्रामस्थांनी प्रथमच नैसर्गिक चमत्कार अनुभवला. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला सकाळच्या सोनेरी किरणांनी सूर्यस्नान झाले. या किरणांनी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी देवीच्या मूर्तीवर येत तिला अभिषेक घातल्याची ही घटना ‘याची देही, याची डोळा’ अनुभवली.

  नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मावळतीला अंबाबाईच्या मूर्तीस सूर्यस्नान होते. हा प्रसिध्द किरणोत्सव पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित असतात. पण रत्नागिरीनजीकच्या बसणी येथील प्राचीन मंदिर श्री देवी महालक्ष्मीच्या ठिकाणीही मूर्तीवर किरणोत्सव होतो याची आजपर्यंत तेथील ग्रामस्थांनीही कल्पना नव्हती. उगवतीचा सूर्य जेव्हा मंदिराच्या द्वारासमोर येतो, तेव्हा सकाळची सोनेरी किरणे या देवीच्या मंदिरात प्रवेश करतात. पण या प्रत्यक्ष किरणोत्सवाची अनुभूती कुणी ग्रामस्थांनी घेतलेली नव्हती.

  शनिवारी गावातील प्रशांत बंदरकर या देवीच्या मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना थेट सभामंडपापासून श्री महालक्ष्मीच्या गाभाऱयापर्यंत देवीच्या मूर्तीवर पोहोचलेली सोनेरी किरणांच्या झळा पाहून आश्चर्य वाटले. या क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्द्ल त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी ही बाब अन्य ग्रामस्थांना सांगितली. गावातील छायाचित्रकार संजय मयेकर यांनी हा सारा नैसर्गिक चमत्कार आपल्या कॅमेऱयात कैद केला.

सुवर्णक्षणांच्या अनुभूतीसाठी ग्रामस्थ मंदिरात

सुमारे 5 मिनिटे श्री देवी महालक्ष्मीच्या मूर्तीला सूर्यस्नान केल्यानंतर ही किरणे लुप्त झाली. पण या अनोख्या किरणोत्सवाने बसणीवासीय सुखावून गेलेत. ज्यांना ही माहिती मिळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मंदिरात धाव घेत या सुवर्णक्षणांची अनुभूती घेतली.

..

Related Stories

घोणसरीत भातशेतीवर निळ्य़ा भुंग्यांचा प्रादुर्भाव

NIKHIL_N

97 अधिकारी-कर्मचारी पदे निर्माण

NIKHIL_N

नमन कलेला राजाश्रय, कलावंताना पेन्शन द्या!

Patil_p

आधी सुविधा द्या, मगच चाकरमान्यांना आणा!

NIKHIL_N

पशुसंवर्धनचे बजेट पोहोचले दोन कोटीवर

NIKHIL_N

कोरोना चाचणीस नकार दिल्यास गुन्हा दाखल होणार

Patil_p
error: Content is protected !!