प्रादेशिक बंदर अधिकाऱयांच्या जहाज मालकाला सुचना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मिऱया येथे अडकलेल्या एमटी बसरा स्टार जहाज दुरूस्त करुन बाहेर काढणे किंवा क्रॅप करणे याबद्दलचा निर्णय जहाज मालकांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी सूचना बंदर विभागात तर्फे देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक पंदर अधिकारी पॅप्टन संजय उगलमुगले यांनी दिली. अजस्र लाटांच्या माऱयामुळे खडकावर आपटून या जहाजाचे वीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असून जहाजात समुद्राचे पाणी शिरले आह़े
काही दिवसापूर्वी जहाजावरील सुमारे सात हजार लिटर ऑईल व 25 हजार डिझेल काढण्यात आले. त्यानंतर जहाज बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ सद्यस्थितीत हे जहाज खडकांवर आपटून मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने ते तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आह़े मात्र त्यासाठीचा खर्च कोटींच्या घरात जाणार आहे. जहाज दुरुस्त करायचे किंवा स्पॅप करायचे याबद्दचा निर्णय जहाज मालकांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी सूचना बंदर विभागामार्फत करण्यात आली आह़े सद्यस्थितीत खराब वातावरणामुळे दुरुस्ती अशक्य आह़े शिवाय यासाठी कोटय़वधींचा खर्चही येणार आहे. त्यामुळे जहाज दुरुस्त होणार की स्प्रॅप याकडे अनेकांचे लक्ष लागले आह़े