Tarun Bharat

बसवण कुडची येथे दौडला प्रतिसाद

वार्ताहर / सांबरा

बसवण कुडची येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामात दौडला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी गावातील मुलींनी किल्ला येथी दुर्गामाता मंदिरातून ज्योत आणली.

पहाटे चार वाजता आरती ज्योत आणण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जवान राजू कुदोहळ उपस्थित होते. त्यानंतर गांधीनगर येथील गणपती मंदिरला भेट देण्यात आली. तेथून गावामध्ये आल्यानंतर ज्योतीचे गल्लोगल्लीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावांमध्ये दौड काढण्यात आली. सांबरा रोड, विद्यानगर, तानाजी गल्ली, गांधी गल्ली, नागदेव गल्ली, विठ्ठल रखुमाई गल्ली, शिवाजी गल्ली येथून कलमेश्वर बसवाण्णा मंदिर येथे आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. ज्योत आणताना सोनाली बेडका, राजश्री भडाचे, वैष्णवी सामजी, आरती मुतगेकर, अश्विनी चौगुले, रोहिणी पाटील, संजना घसारी, मिताली दिवटे, पूनम तारीहाळकर, धनश्री भडाचेसह आदी मुलींचा सहभाग होता. युवकांबरोबर मुलींनीही दौडमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी विविध स्फर्तीगिते व देवदेवतांच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता. दौडीचे विविध ठिकाणी आरती ओवाळून स्वागत करण्यात आले.

Related Stories

भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांची अमलबजावणी करा

Amit Kulkarni

पोस्टल मतदानासाठी शहरातील 1373 वृद्धांची नोंदणी

Amit Kulkarni

अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना 75 युनिटपर्यंत वीज मोफत

Patil_p

रेड्डी भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Patil_p

मीटर रिडरने ग्राहकांना लावला चुना

Patil_p

मद्यविक्री दुकानात चोरीचे प्रकार वाढले

Patil_p