Tarun Bharat

बसवाहकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार

Advertisements

परिवहनला फटका, वरिष्ट अधिकाऱयांनी लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

परिवहनच्या बस वाहकाकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशा गैरव्यवहाराला आळा घालावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. प्रवाशांकडून पैसे घेतले जात आहेत. मात्र तिकीट दिले जात नाही किंवा दिलेले तिकीट परत मागून घेणे आणि इतर प्रवाशांना देणे असे प्रकार वाढले आहेत. एका जुन्या तिकिटाचा वापर करून बसवाहक पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिवहनच्या वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष घालून संबंधित बसवाहकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बसस्थानकातून दररोज विविध मार्गांवर 750 हून अधिक बस धावत असतात. यामध्ये बसचालक आणि वाहकांची संख्या देखील अधिक आहे. ग्रामीण भागात धावणाऱया बसवाहकांकडून प्रवाशांना तिकीट न देताच प्रवास भाडे घेणे किंवा दिलेले तिकीट बसमधून उतरताना परत मागून घेणे असे प्रकार वाढले आहेत. एखाद्या प्रवाशांकडून मागून घेतलेले तिकीट बसमध्ये चढलेल्या नवीन प्रवाशाला देणे असेही घडत आहे. पैसे उकळण्यासाठी काही बसवाहकांकडून असे प्रकार सुरू आहेत. अशा गैरव्यवहारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

बस वाहकाला समज द्यावी

कोरोनामुळे परिवहनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे परिवहन महसूल वाढविण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र परिवहनच्याच काही बसवाहकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे परिवहनचा महसूल वाढणार आहे का कमी होणार? असा प्रश्न देखील प्रवाशांतून उपस्थित होत आहे. प्रवाशांना तिकीट न देताच त्यांच्याकडून कमी प्रवास भाडे घेणे किंवा जुन्या तिकिटाचा वापर करणे आणि प्रवाशांनी दिलेले पैसे खिशात घालणे, असे प्रकार काही मार्गांवर बसवाहकांकडून सुरू आहेत. तात्काळ वरिष्ट अधिकाऱयांनी विविध मार्गांवर तपासणी करून संबंधित बसचालक आणि वाहकाला समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

गळीत हंगामाची सुरुवात धिम्म्या गतीने सुरू

Patil_p

पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी

Omkar B

ध. संभाजी चौकातील बसथांब्यावर तिसऱयांदा खोदाई

Amit Kulkarni

ग्राहकांचे पैसे लाटणाऱया मीटर रिडरचे निलंबन

Patil_p

न्यायालयीन वादामुळे मनपाच्या महसुलावर पाणी

Omkar B

आरसीयूच्या कारभाराची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

Amit Kulkarni
error: Content is protected !!