Tarun Bharat

बसवेश्वरांची तत्वे आजही समाजासाठी मार्गदर्शक

528 कोटी 83 लाख रु. निधी मंजूर

वार्ताहर/ विजापूर

शहरातील रेल्वे स्टेशन रस्ता ते गुरुदत्त मंगलकार्यालय ते हरणशीकारी कॉलनी जोड रस्त्याचे सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी लोकोपयोगी खात्याकडून 12.83 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

गांधी चौकाजवळ असलेल्या लायब्ररीच्या बांधकामाचे, याचप्रमाणे बबलेश्वर नाका येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने नवीन दुकान गाळय़ाचे भूमिपूजन आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या झाले. या तिन्ही कामासाठी 528 कोटी 83 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले बबलेश्वर नाका येथे दुकान गाळय़ाचे साईज 10 बाय 12 चे 12 गाळे व 12 बाय 16 चे 3 गाळे असे एकूण 15, तर पहिल्या मजल्यावरील 15 गाळे इतके आहेत. दुसऱया मजल्यावर पण इतकेच गाळे असतील. असे एकूण 45 गाळे असतील. यापैकी 50 टक्के गाळे एससीकरिता व  उरलेले सामान्य युवक-युवतींना देण्यात येतील, असे सांगितले.

विकासाचे पर्व सुरू झाले आहे. यापुढे पत्र्याची घरे, झोपडय़ा दिसणार नाहीत. पिण्याचे पाणी, सी.सी. रस्ता, डेनेज व्यवस्था करणे व सुंदर शहर निर्माण करण्यासाठी काम सुरू आहे.  

 याप्रसंगी शहर विकास प्राधीकार अध्यक्ष श्रीहरी गोळसंगी, सदस्य विक्रम गायकवाड, नेते संतोष पाटील, राजेश देवगरी, भिमू माश्याळ, चंदु चौधरी, शंकर हुगार, ए. इ. मुजुमदार, प्रकाश कादरी, अशोक बेळ्ळद, गुत्तेदार ए. एस. मठ, गुरुराज गंजनहळ्ळी, सायिबण्णा भूवी, पारीश शिरहट्टी, संगनबसव नाडगौड, महेश गणी, शंकर भूवी, बसवराज गोलसंगी, बसवराज बिरादार, राजशेखर बजेंत्री, शरणू कांकडकी, नागराज मुलवाड, मनोज बिरादार आदी उपस्थित होते.़

Related Stories

पतंजलीतर्फे योग कक्षाचा वर्धापन दिन साजरा

Omkar B

एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, विश्रुत स्ट्रायकर्स यांची विजयी सलामी

Amit Kulkarni

बाकनूर गावात फुलली झेंडूची शेती

Amit Kulkarni

ओझे अन् जबाबदारी यातील फरक म्हणजे आयुष्य!

Omkar B

बेजबाबदार अधिकाऱयांना निलंबित करा

Amit Kulkarni

वेणुग्राम सायकल क्लबच्या 11 सायकलपटूंनी रचला नवा विक्रम

Amit Kulkarni