Tarun Bharat

बसवेश्वर उड्डाणपुल वाहतुकीस खुला

स्टेशनरोड मार्गे यावे लागणार शहरात

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मागील आठवडय़ापासुन लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने काही रस्ते खुले करण्यात आले आहेत. पण आतापर्यंत बंद असलेला बसवेश्वर उड्डाणपुलावरील रस्ता रविवारपासून खुला झाला आहे. याठिकाणी असलेले बॅरिकेड्स हटविण्यात आल्याने  स्टेशनरोड मार्गे शहरात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

कोरोना विषाणुचा फैलाव झाल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. प्रारंभी बेळगाव शहरात कोरोनाचे रूग्ण अढळून आले नाहीत. मात्र टप्प्या टप्प्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली. तसेच कॅम्प परिसरातील एका नागरिकाला कोरोनाची लागन झाल्याचे निदर्शनास आल्याने खानापूर रोडवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच गोगटे चौकाजवळी बसवेश्वर उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून हा रस्ता देखील बंद ठेवण्यात आला होता. तब्बल दीड महिना हा रस्ता बंद ठेवण्यात आल्याने ठिळकवाडी, शहापुर, वडगाव, येळ्ळूर परिसरातील नागरिकांना कपिलेश्वर रोड मार्गे शहरात यावे लागत होते. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून अडथळे निर्मान करण्यात आल्याने अडथळय़ांची शर्यत पार करून नागरिकांना शहरात यावे लागत होते. पण मागील आठवडय़ापासून लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे काही रस्त्यांवरील बॅरिकेड्स हटवुन वाहनधारकांना ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण कॅन्टोन्मेंटमधील रूग्ण मागिल आठवडय़ात कोरोनामुक्त झाल्याने 14 दिवस हा परिसर निर्बंधीत राहणार आहे. त्यामुळे खानापूर रोड अद्यापही वाहतुकीस खुला करण्यात आला नाही. मात्र रविवारी गोगटे उड्डाणपुलावरून बॅरिकेड्स हटवून टिळकवाडी, शहापूर  भागातील वाहनधारकांसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. पण गोगटे चौकातील बॅरिकेड्स हटविण्यात आले नाहीत. त्यामुळे शहरात येण्यासाठी या भागातील नागरिकांना स्टेशन मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

Related Stories

महापालिका कार्यालयात जन्म -मृत्यू दाखले देणाऱ्यांचे प्रस्थ वाढले

Tousif Mujawar

लालपरीची धाव सीमाहद्दीपर्यंत

Amit Kulkarni

सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्यनिधी सुपूर्द

Amit Kulkarni

गोंधळी गल्लीत उद्यापासून दत्त जयंती उत्सव

Patil_p

महापालिका बजेटअंतर्गत पावणे दोन कोटी राखीव निधी

Amit Kulkarni

खानापुरात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप

Amit Kulkarni