Tarun Bharat

बससेवा बंदच… 17 मे पासून सुरू होण्याची शक्मयता

बेळगाव : / प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्हा ऑरेंज झोन म्हणून घोषित करण्यात आला असून सोमवारी  काही अंशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. तरी देखील सर्व प्रकारच्या बसेस बंद होत्या. कोरोनाबाबतची पुढील परिस्थिती पाहूनच दि. 17 मे पासून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंडळाच्या विभागीय संचार अधिकाऱयांनी दिली.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 22 मार्च पासून सर्व प्रकारच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाला दररोज कोटय़ावधी रूपयांचा फटका बसत आहे. सोमवारपासून शहरात काही अंशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

 परिवहन मंडळाचे कर्मचारी दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी बस आगारात दाखल झाले. यावेळी त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत आगारात थांबून असलेल्या बसेसवर सॅनिटायझरची फवारणी केली. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी गेलेल्या चालक व वाहकांनाही बससेवा सुरू होताच हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बेळगाव आगारातून दरारोज स्थानिक बसेससह निपाणी, कोल्हापूर, संकेश्वर, इचलकंरजी, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कराड, मुंबई, धारवाड, हुबळी, मंगळूर, बेंगळूर, गोवा, चिपळूण, विजापूर, हैद्राबाद आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस धावत असतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात महसूल देखील मिळत असतो. मात्र मागील 40 दिवसांपासून बससेवा बंद असल्याने महसूलही ठप्प झाला आहे. 

बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्र व गोवा राज्यांत धावणाऱया बसेसची संख्या अधिक असून तिरूपती, म्हैसूर, गोवा, विजापूर, बेंगळूर आदी पर्यटन स्थळांकडे धावणाऱया बसेस अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बेळगाव आगाराला बसला आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण वाहतूक क्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बरेच कामगार व पर्यटक परराज्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. तर काही जण पायी चालत प्रवास करत आहेत. अशा नागरिकांनी   आपल्या जवळच्या बस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बेंगळूर बसस्थानक- 7760990562, चित्रदूर्ग बसस्थानक-8194222431, दावणगिरी बसस्थानक – 7760106655, हासन बसस्थानक- 7760990520, कोलार बसस्थानक -7760990611, म्हैसूर- बसस्थानक 8212424995, शिमोगा बसस्थानक -9972288421, तुमकुर बसस्थानक 9741495772, उडपी बसस्थानक – 9663266400, बेळळारी-7760973329, बिदर बसस्थानक – 7760973308, कोप्पळ-7760973345, रायचूर बसस्थानक- 7760973299, बागलकोट बसस्थानक -7760991783, बेळगाव बसस्थानक-9742343744, गदग बसस्थानक-7760991833, हुबळी बसस्थानक – 8970395465, कारवार बसस्थानक- 7760973437, शिरसी बसस्थानक -8970395465

Related Stories

म. ए. समितीच्या ध्येयधोरणांशी बांधिल

Amit Kulkarni

काळय़ादिनी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित राहणार

Omkar B

परगावाहून येणाऱयांनी नियम पाळण्याची गरज

Omkar B

बसपास वेळेत मिळविणे आवश्यक

Omkar B

रोज चषक बेबी फुटबॉल स्पर्धेत मानस अकादमी उपविजेता

Amit Kulkarni

पंत बाळेकुंद्रीला बसफेऱया वाढवा

Amit Kulkarni