Tarun Bharat

बसस्थानकाच्या कामाला कधी गती येणार?

सीबीटीचे काम संथगतीने, अद्याप निम्मे काम शिल्लक : प्रवाशांतून नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव

मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू असल्याने पूर्णत्वास कधी जाणार? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत बसस्थानकाच्या कामाला चार वर्षांपूर्वी प्रारंभ झाला होता. मात्र अद्याप केवळ एका मजल्याचेच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्ण व्हायला किती वर्षे लागतील? असा प्रश्नदेखील प्रवाशांतून उपस्थित होत आहे. वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन काम जलदगतीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांच्या सोयीखातर जुने सीबीटी बसस्थानक हटवून या ठिकाणी सुसज्ज असे बसस्थानक उभारण्यात येत आहे. दरम्यान या ठिकाणी विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पार्किंगसाठी तळमजल्यात व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने पूर्ण होण्यास अजून किती वर्षे लागतील? असा संतप्त सवालदेखील प्रवाशांतून केला जात आहे.

सीबीटी बसस्थानकाच्या कामासाठी तब्बल 102 कोटींचा निधी खर्ची घालण्यात येणार आहे. मात्र कामाला सुरुवात होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप निम्मे काम शिल्लक आहे. मध्यंतरी कोरोनामुळे काम थांबले होते. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या कामाला गती न मिळाल्याने काम पूर्ण होण्यास किती दिवस लागणार? अशी चिंता व्यक्त होत आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न

सीबीटी आणि मध्यवर्ती बसस्थानक जोडण्यासाठी भुयारीमार्गाची व्यवस्था केली जात आहे. मात्र हे कामदेखील रखडल्याने बसस्थानकात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. सीबीटी आणि मध्यवर्ती बसस्थानकात शहर, ग्रामीण आणि लांबपल्ल्याच्या बससाठी फलाट उभारले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. मात्र धिम्यागतीने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.\

Related Stories

आर. ए. लाईन मंदिरजवळील रस्ता खुला करा

Amit Kulkarni

लोकमान्य दीपावली किल्ला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

मराठा बँकेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

Patil_p

पंपहाऊससाठी सपाटीकरणाच्या कामास शेतकऱयांचा विरोध

Patil_p

विनाअनुदानित शाळा-शिक्षकांचे 20 रोजी आंदोलन

Patil_p

लिंगराज कॉलेजमध्ये हिजाबवरून वाद

Tousif Mujawar