Tarun Bharat

बसस्थानकात पार्किंगअभावी प्रवाशांची गैरसोय

रस्त्याशेजारी पार्क केली जातात वाहने, वाहतुकीला अडथळा

प्रतिनिधी/ बेळगाव

सतत गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. बसस्थानकात पार्किंग व्यवस्थेअभावी खासगी वाहने चुकीच्या पद्धतीने पार्क केली जात आहेत त्यामुळे वाहतूक केंडीची समस्या निर्माण होत आहे. सुसज्ज स्मार्ट बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. याकरिता तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करून प्रवासी वाहतूक सुरु आहे. मात्र या बसस्थानकात प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

अनलॉकनंतर विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरु झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने प्रवाशांची संख्यादेखील वाढली. मात्र बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याचा अभाव, अस्वच्छता, अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा याबरोबर पार्किंगची सोय नसल्याने खासगी दुचाकी आणि चारचाकी धारकांना वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे बसस्थानकात पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

खानापूर, संकेश्वर, बैलहोंगल, चिकोडी, निपाणी, हुक्केरी, अथणी यासह सीमाहद्दीवरून बसस्थानकात स्वतःची वाहने घेवून येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान स्वतःचे वाहने घेवून येणारे प्रवासी बसस्थानकात वाहने पार्क करून पुढील प्रवास करत असतात. मात्र बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना बसस्थानकाच्या बाहेरच, रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागत आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

Related Stories

जेष्ठ सर्वोदयी स्वातंत्र्यसैनिक सदाशिव बापूसाहेब भोसले यांचे दुःखद निधन

Amit Kulkarni

दोन मुलांसह आईची आत्महत्या

Amit Kulkarni

डीपीआर मंजुरीनंतरच कणबर्गी वसाहतीचे काम मार्गी

Omkar B

अवघे गर्जे कपिलेश्वर….!

Amit Kulkarni

उमेदवारी माघारी घेण्यासाठी शिवाजी सुंठकर यांच्यावर दबाव

Amit Kulkarni

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांचे आमदार निंबाळकरांकडून अभिनंदन

Amit Kulkarni