Tarun Bharat

बसस्थानकात प्रवासकार्ड वितरणाला प्रारंभ

Advertisements

अनगोळ, वडगाव, येळ्ळूर मार्गावरील प्रवाशांना कार्ड : येत्या पंधरवडय़ात सर्वच बसमध्ये सुविधा

प्रतिनिधी /बेळगाव

प्रवास सुखकर व्हावा, यासाठी परिवहनने ‘प्रवासकार्ड, कॅशलेस योजना’ सुरू केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात प्रवास कार्डचे वितरण केले जात आहे. सध्या अनगोळ, वडगाव आणि येळ्ळूर भागातील बसना ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र येत्या काही दिवसात सर्वच बसमध्ये ही सुविधा पुरविली जाणार असल्याची माहिती परिवहनने दिली.

प्रवासाप्रसंगी प्रवासी आणि बसवाहकांमध्ये सुटय़ा पैशावरून वाद निर्माण होतात. मात्र आता या प्रवास कार्डमुळे सुटय़ा पैशांची समस्या सुटणार आहे. परिवहनकडून हे प्रवासकार्ड मोफत वितरित केले जात असले तरी रिचार्ज करणे आवश्यक आहे. साधारण 100 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करून हे कार्ड प्रवासासाठी वापरता येते. या कार्डमुळे दैनंदिन प्रवास करणाऱया कामगार, नोकरदार वर्गाला ही योजना सोयीस्कर ठरणार आहे.

सुटय़ापैशांचा प्रश्न मार्गी लागणार

दैनंदिन जवळचा आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. निपाणी, सौंदत्ती, बैलहोंगल, बागलकोट, चिकोडी, रायबाग, हुक्केरी येथील प्रवाशांना हे प्रवासकार्ड उत्तम ठरणार आहे. त्याबरोबर स्थानिक प्रवाशांनादेखील या कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे खिशात पैसे आहेत की नाही याची चिंता करावी लागणार नाही. शिवाय या कार्डच्या माध्यमातून कुटुंबातील वा मित्रपरिवारातील कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकते. दरम्यान प्रवासी जितका प्रवास करतील तितकेच पैसे या कार्डमधून वजा केले जाणार आहेत. विशेषतः सुटय़ापैशांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

प्रवाशांनी कार्ड घेऊन प्रवास करावा

अनगोळ, वडगाव, येळ्ळूर या मार्गावर धावणाऱया बससाठी प्रवासकार्ड योजना सुरू केली आहे. बसस्थानकात या प्रवासकार्डचे वितरण सुरू आहे. प्रवाशांनी कार्ड घेऊन या माध्यमातून प्रवास करावा. येत्या 15 दिवसात सर्वच बसमध्ये ही सुविधा पुरविण्याचा विचार सुरू आहे.

– के. के. लमाणी (विभागीय संचाराधिकारी)

Related Stories

पाईपलाईन रस्ता अडकला हद्दीच्या वादात

Amit Kulkarni

वडगावची ग्रामदेवता मंगाई देवीची यात्रा 14 जुलै रोजी

Patil_p

मानवतेचा संदेश देणारे संत कबीर

Omkar B

लक्ष्मी मुचंडी यांची 1 लाखाची मदत

Patil_p

रेल्वेत अधिक साहित्य न्याल तर बसेल दंड!

Amit Kulkarni

आतापर्यंत 13 हजार जनावरांना लम्पिस्कीन प्रतिबंधक लस

Patil_p
error: Content is protected !!