Tarun Bharat

बसस्थानकावर प्रवाशांची रेलचेल वाढतेय !

Advertisements

खेड आगारातून ग्रामीण मार्गांवरील 24 बसफेऱयांना प्रतिसाद

प्रतिनिधी/ खेड

खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात बसफेऱया सोडण्यास सुरूवात झाली आहे. येथील आगारातून गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागातील 24 मार्गांवर बसफेऱया चालवण्यात येत आहेत. या बसफेऱयांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने  बसस्थानकावर हळूहळू प्रवाशांची रेलचेल वाढू लागली आहे.

लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून ग्रामीण भागातील बसफेऱयांना ब्रेक लागला होता. लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर 25 मे पासून केवळ रत्नागिरी, दापोली, मंडणगड, चिपळूण मार्गावर बसफेऱया चालवण्यात येत होत्या. मात्र ग्रामीण भागातील फेऱया सुरू करण्यात आल्या नव्हत्या. अखेर 13 जूनपासून भडवळे, पन्हाळजे, अणसपुरे, शेल्डी मार्गे माणी या मार्गावर सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक बसफेरी चालवण्यात येत होती. या बसफेऱयांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर काही दिवसांपासून ग्रामीण भागातील 13 मार्गांवर बसफेऱया सुरू करण्यात आल्या होत्या. या फेऱयांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बसफेऱयांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत पन्हाळजे, कशेडी, आष्टी या मार्गांवर दिवसातून 3 बसफेऱया धावत आहेत. शेल्डी, अणसपुरे, भडगाव, भडवळे, शिरगाव, वाक्षेपवाडी, तुळशी, तिसंगी, तिसे, गणवाल, शेरवली, संगलट, आयनी, चिंचवली, मोरवंडे, शिव, वडगाव, नांदिवली, आंबये, बिजघर, दयाळ, पोयनार, किल्लेमाची आदी मार्गांवरही बसफेऱया धावत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

‘वाशिष्ठी’त कुणीही या अन् गाळ उपसा!

Patil_p

श्री समर्थ’च्या स्फोटातील आणखी दोन जखमी कामगारांचा मृत्यू

Patil_p

देव रामेश्वर देवस्थानच्या शाही गणेशोत्सवाची सांगता

NIKHIL_N

सावंतवाडीची ओळख कायम ठेवू

NIKHIL_N

तुळस येथे 9 जानेवारीला वकृत्व स्पर्धा

NIKHIL_N

पाथरटच्या गुरूजींनी केल्या शाळेच्या अबोल भिंती बोलक्या!

Patil_p
error: Content is protected !!