Tarun Bharat

बसस्थानक प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी

रस्त्यावर खडी, मातीसह इतर साहित्य पडून असल्यामुळे रहदारीला अडथळा

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले बसस्थानकाचे काम, बसस्थानकाचे बदललेले प्रवेशद्वार, प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ आणि रस्त्यावर अर्धवट स्थितीत असलेली कामे यामुळे बसस्थानकासमोरील सर्किट हाऊस ते जुने भाजी मार्केट मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. या मार्गावर खासगी वाहने आणि बसच्या संख्येत वाढ झाल्याने बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध मार्ग, गटारी, डेनेजवाहिन्यांचा विकास सुरू आहे. या कामांमुळे रस्त्यांवर खडी, माती व इतर साहित्य पडून आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी कामांमुळे वाहतूक बंद असून काही ठिकाणी मार्गात बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्यांतर्गत बससेवा सुरळीत सुरू झाल्याने विविध मार्गावर बस धावत आहेत. तसेच नवरात्रोत्सवानिमित्त प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणांहून येणाऱया बसची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे सर्किट हाऊस ते जुने भाजी मार्केट मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच बाजारात येणाऱया वाहनांची ये-जा देखील या मार्गावरूनच सुरू आहे. त्यातच प्रवाशांसाठी खासगी रिक्षा व टेम्पोवाले बसस्थानक प्रवेशद्वारावरच वाहने थांबवून गर्दी करत आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक कोंडी होत आहे.

Related Stories

मतमोजणीसाठी साडेसातशे कर्मचाऱयांची कोरोना चाचणी

Amit Kulkarni

मंडोळी हायस्कूलमध्ये मराठी भाषादिन उत्साहात

Amit Kulkarni

विमानतळ प्राधिकरणाकडून बेळगाव विमानतळाचे कौतुक

Patil_p

शांताई वृद्धाश्रमातर्फे आशा कार्यकर्त्यांचा सत्कार

Amit Kulkarni

गणित विषय शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

जलवाहिन्यांच्या कामामुळे हिंदवाडीतील रस्ता बंद

Amit Kulkarni