Tarun Bharat

‘बसेरा’तर्फे सुरक्षाकर्मींना कमी दरात जेवणाची सोय

 

प्रतिनिधी/ पणजी

सांत ईनेझ येथील ‘बसेरा’ या फॅमिली हॉटेलतर्फे देशाचे खरे हिरो जे आमच्यासाठी व आमच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत असतात अशा विविध सुरक्षा खात्यांच्या कर्मचाऱयांना कमी दरात शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली आहे.

 काल बुधवारी बसेराचे मालक विजय जी. टी यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांच्याहस्ते या शुभकामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सेनादलाचे लेफ्टनंट कर्नल दिवेय सैल, मेजर शिबानंदा मल्लिक यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

 ओळखपत्र दाखवून जेवण घ्यावे

या योजने अंतर्गत शाकाहारी जेवणाचा दर रु. 30 व मासाहारी जेवणाचा दर रु. 50 असणार आहे. ही योजना पोलिस, सेनादल, वायुदल, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक, अग्निशामक दल, व इतर सुरक्षा दलाच्या कर्मचाऱयांना मर्यादित असणार आहे. आपले ओळखपत्र दाखवून जेवणाचा आस्वाद घ्यावा. सदर जेवण सोमवार ते शनिवार दरम्यान दु. 12 ते 3 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

अनेक सुरक्षा रक्षकांना वेळ नसल्याने जेवण करता येत नाही, अशा सुरक्षाकर्मींना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच लांबचा प्रवास करणाऱयांनाही याचा फायदा होणार आहे. सुरक्षा कर्मचाऱयांनी मुद्दामहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे पोलिस निरिक्षक सुदेश नाईक यांनी यावेळी सांगितले. ….

गरजुंना 24 तास मोफत जेवण

बसेरातर्फे याआधी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गरजुंना 24 तास मोफत जेवणाची योजना अस्तित्वात आणली होती जी अजून सुरु आहे. या योजनेअंतर्गत हॉटेलच्या बाहेर एक खास दालन उभारण्यात आले असून यामध्ये नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण उपलब्ध असते. तसेच जर कुणाला यामध्ये स्वतःकडचे जेवण ठेवायचे असेल तर त्यांनी ते या दालण्यात ठेवता येते. अशा संकल्पनेवर हे दालन सध्या गरजूंसाठी 24 तास सुरु आहे.

Related Stories

राज्यात कोरोनाचा नववा बळी

Patil_p

व्यासपीठावरील कलाकारांबरोबरच पडद्यामागील कलाकारांनाही पुरस्कार देणार

Patil_p

आयआयटी विरोधात पुन्हा एल्गार

Patil_p

पेप गार्डीओला यांना सर्वोत्तम व्यवस्थापक पुरस्कार

Patil_p

देशातील प्रादेशिक पक्षांची कार्यशैली शिकतोय

Patil_p

अन्यथा खंवटेंच्या भानगडी उघड करणार

Patil_p