Tarun Bharat

बसेसमध्ये आता आयसीयु बेडचीही व्यवस्था

Advertisements

केएसआरटीसीकडून प्रत्येक बसमध्ये 10 लाख खर्चून सुविधा

प्रतिनिधी / बेंगळूर

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बसेसमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष आयसीयु बेड्सची व्यवस्था केली आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या संचारी आयसीयु बसेसचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर, केएसआरटीसीचे अध्यक्ष एम. चंद्रप्पा यांच्या उपस्थितीत बुधवारी लोकार्पण करण्यात आले.

सदर बसेसमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी सर्व सुविधा निर्माण केल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये पाच आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली असून ऑक्सिजनची सुविधा आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा, रक्तदाब, ऑक्सिजन तपासणी, ईसीजी, तापमान मोजणीची व्यवस्थाही या बसेसमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तातडीने औषधांची व जनरेटर व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, बसेसमध्ये ऑक्सिजनसह आयसीयु बेडची व्यवस्था करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च परिवहन महामंडळाकडूनच करण्यात आला आहे. अलिकडेच परिवहनच्या 4 निगममध्ये 12 हून अधिक ऑक्सिजन व्यवस्था असणाऱया बसेस कार्यरत आहेत. त्यामध्ये चित्रदुर्ग, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, गुलबर्गा आणि बेळगावमध्ये तर बेंगळूरमध्ये बीएमटीसीकडून अशा ऑक्सिजन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन बसेस ऍम्ब्युलन्सच्या धर्तीवर विकसित करण्यात आल्या आहेत.

Related Stories

कर्नाटक : ‘या’ तारखेपासून नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग भरणार

Abhijeet Shinde

राज्यात पदवी परीक्षा वेळेवर होतील : उच्च शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde

पाणी पुरवठा सुधारीकरणासाठी 17.70 कोटींचा प्रस्ताव

Rohan_P

रवी चेन्नण्णावर यांच्यासह12 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात कोरोनाचा वेग वाढला

Abhijeet Shinde

कर्नाटक: उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!