Tarun Bharat

बस्तोडा पंचायत क्षेत्रात विकास कामांना गती

Advertisements

आमदार ग्लेन टिकलो सौझा यांच्याकडून संरक्षण भिंतीचा शुभारंभ

प्रतिनिधी / म्हापसा

बस्तोडा पंचायत क्षेत्रात असलेल्या पंच सदस्य सावियो मार्टिन्स यांच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये येथील संरक्षण भींत व गटार योजना व हॉटमिक्स कामाचा शुभारंभ आमदार ग्लेन टिकलो यांच्याहस्ते नारळ वाटवून करण्यात आला. यावेळी बस्तोडा पंचायतीचे सरपंच रणजीत उजगावकर, माजी पंच प्रतीक्षा मयेकर, सावियो मार्टिन्स, राजेंद्र नारोजी, सुनिता वेर्णेकर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार टिकलो यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर यांचे आभार मानले. वॉर्ड क्रमांक 2 मध्येही संरक्षण भींत पुन्हा बांधणीकाम हाती घेण्यात आले. 87 लाखाचे काम हाती घेण्यात आले आहे. खोर्जुवे येथे विसर्जन तळी, पौडवाल येथे पायऱया बांधून घेतल्या. या श्रावणात भरपूर कामे हाती घेतली आहेत. सार्वजनिक बांधकाम योजनेंतर्गत 80 कोटीची कामे हाती घेतली आहेत. कोविडमुळे कर्मचारीवर्ग आजारी पडले. ती सर्व कामे वीज, रस्ते, बांध आदी सर्व त्वरित हाती घेण्यात येतील अशी माहिती आमदार टिकलो यांनी दिली. मुख्यमंत्री याकामी सर्व तऱहेने सहकार्य करीत आहे. सर्वत्र संरक्षण भिंतीचे कामही हाती घेतल्याची माहिती आमदार टिकलो यांनी दिली.

आमदार विकासकामासाठी सदैव पुढेप्रतीक्षा मयेकर

वॉर्ड क्रमांक 2 च्या पंच प्रतीक्षा मयेकर म्हणाल्या की, आमदार टिकलो यांनी खूप कामे केली आहे अन्य बरीच कामे बाकी आहेत ती आमदार टिकलो यांच्याहस्ते पूर्ण होणार असून ते विकास कामे करण्यासाठी सदैव सक्षम असतात असे मयेकर म्हणाल्या.

आमदाराने हळदोणा मतदारसंघात कायापालट केला

बस्तोडा सरपंच रणजीत उजगावकर म्हणाले की, बार्देशात आमदार ग्लेन टिकलो सौझा यांनी आजवर जितकी विकासकामे हाती घेतली आहे इतकी अन्य कुणी घेतलेली नाही. हळदोणा मतदारसंघात आमदारांनी चौफेर विकास केला आहे. यामुळेच इथले ग्रामस्थ पुन्हा आमदारांना संधी देणार आहेत. बस्तोडा गाव आमदार टिकलो यांनी कायापालट केला आहे असे ते म्हणाले.

संरक्षण भिंतीचा नागरिकांना फायदा

माजी सरपंच सावियो मार्टिन्स म्हणाले की, संरक्षण भिंतीमुळे या गावातील नागरिकांना फायदा होणार आहे. या बाजूनी गावातील लोक सदैव ये-जा करीत असतात आपण त्यांना चांगले आरोग्य मागतो व गावात विकास कामाचा भरभराट होवो असे ते म्हणाले.

Related Stories

तिसऱया दिवशीही ‘अर्पित’चा शोध सुरुच

Amit Kulkarni

रविवारी विक्रमी 506 बाधित

Omkar B

खंडित विजेच्या समस्येमुळे मोले, कुळेतील नागरिक आक्रमक

Patil_p

दिवसभरात चार हजार कोरोनामुक्त

Amit Kulkarni

अंगणवाडी सेविकांचे उपोषण सुरुच

Amit Kulkarni

शांतादुर्गा वेर्डेकरीण देवीचा कालोत्सव – जत्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!