Tarun Bharat

बस अपघातात 20 जण जखमी

शिरसई येथील घटना चालकाचा ताबा सुटूक वीजखांबाला जोरदार धडक

वार्ताहर/ थिवी
शिरसई झारापकर पेट्रोल पंपाजवळ गोपाळकृष्ण देवळानजीक वाळपईतून म्हापसा पणजी येथे जाणाऱया प्रवासी बसची (जीए 03 एन 1023) वीज खांबाला जोरदार धडक बसून अपघात झाला. यामध्ये चालकासह 20 जण जखमी झाले. तर बसच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाला.

 शनिवारी दि. 30 रोजी दुपारी 3 वा. ही घटना घडली. जखमींना पोलिसांनी आणि स्थानिकांनी मदत करून 108 रुग्णवाहिकेने म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात पाठविले. तेथे जखमींवर उपचार करण्यात आले. जखमींमध्ये 13 महिला व सहा पुरुष तसेच एका बालकाचा समावेश आहे. यामध्ये फातिमा सय्यद(48, डिचोली), सुरेखा सुरेश नाईक(57, डिचोली), संजना संजीव नाईक(30,वाळपई), कल्पना बाबलो नाईक(39,वाळपई) अंजली प्रभू(1 वर्ष वाळपई), रीमा सिग्नेकर(26, वाळपई), सारा आंद्रेत(29, अस्नोडा) प्राची देवीदास (28, शिरगाव), सुवर्णा सुरेश नाईक(45,डिचोली), दत्ताराम शिरोडकर(45, डिचोली), प्रतिकेश तळवणकर(32, कुडाळ), इम्रान शेख(27, वाळपई), राकेश बांदेकर(37, सांखळी), मोनिका फर्नांडिस(18, वाळपई), सिम्मी नाईक(44, कुंभारजुवा), संजना वरक(30, वाळपई), सुवानी नाईक(44,कुंभारजुवा), सर्फराज शेख(48, डिचोली), परवीन सय्यद(45, डिचोली), राकेश गोडेकर(37 चालक) यांचा समावेश आहे.
  बस भरधाव वेगात असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बसची वीजखांबावर जोरदार धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेत वीज खांब तुटून खाली कोसळला. या अपघातामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली. कोलवाळ पोलीस स्थानाकचे उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय गावकर यांनी पंचनामा केला. पुढील तपास कोलवाळ पोलीस करत आहेत.

    म्हापसा ते अस्नोडा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे, तसेच रस्ता खुपच अरुंद असल्यामुळे या भागात वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पावसाळय़पूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Related Stories

गोमेकॉतील गैरप्रकार त्वरित थांबवावे

Amit Kulkarni

पेडणे बसस्थानकात वाहतूक खात्याच्या कार्यालयाचे स्थलांतर

Patil_p

गोवा प्रवेशावर 10 पासून कडक निर्बंध घाला

Omkar B

फेसबुकद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला अटक

Patil_p

पणसुलेमळ – खोतीगाव येथील भातशेतीला पुराचा तडाखा

Omkar B

राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेला मेरशीत दिमाखात सुरूवात

Amit Kulkarni
error: Content is protected !!