Tarun Bharat

बस कर्मचारी संप : रस्त्यावर शांतता आणि प्रवाशांचे हाल

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परिवहन महामंडळाच्या कामगारांनी बेमुदत संप सुरू ठेवला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत बेमुदत संप सुरु राहणार आल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हंटले आहे. दरम्यान बस बंद असल्याने रस्त्यावर स्म्शान शांतता आहे. तसेच बसेस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी ६ व्या वेतन आयोगानुसार कर्नाटक सरकार वेतन प्रणाली लागू करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या व ईएसएमएच्या अंमलबजावणीस न झुकता बुधवारी राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा अनिश्चित संप सुरू राहणार आहे. संपामुळे केएसआरटीसी, उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उत्तर-पूर्व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस रस्त्यावर धावलेल्या नाहीत. बस बंद असल्याने लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. सरकारने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना परवानगी दिली आहे.

दरम्यान मोठ्या शहरात नागरिकांचे बस नसल्याने हाल होत आहेत. यामध्ये हुबळीचा जुना बसस्थानक, नवीन बसस्थानक, होसूर येथील बस टर्मिनल, दररोज लोकांच्या गर्दीने भरलेला असतो पण बस बंद असल्याने धारवाड बसस्थानक सुन्न आहे. अनेक मजूर, कामगारांना कामावर जाण्यासाठी जाण्यासाठी संघर्ष करावा लागला. बसस्थानकातील इतर शहरांतील प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागले. खासगी बस, ऑटोरिक्षा, टेम्पो, पिकअपला जादा भाडे देऊन लोक आपल्या गावी निघून जात आहेत.

दरम्यान धारवाड जिल्हा प्रशासन, पोलीस व परिवहन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात बेळगाव, विजापूर, गदगआणि इतर शहरांसाठी खासगी बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हुबळी-धारवाड दुहेरी शहर दरम्यान खासगी बस वाहतुकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षता म्हणून शहरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कायद्याचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
परिवहन कर्मचाऱ्यांनी संपामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून धारवाड जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील १,३११ खासगी वाहने वाहतुकीसाठी रस्त्यावर धावत आहेत. यासह शेजारील गदग, हवेरी, बेळगाव, बागलकोट, विजापूर या शहरांसाठीही खासगी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पोलीस संरक्षण दिले गेले आहे.

बस स्थानकात शांतता
राज्यात बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद राहिल्याने सर्व बस स्थानकात शांतता पहायला मिळाली. यावेळी ग्रामीण भागातील टेम्पो वाहतूक अखंडित राहिली. उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रवाशांना अडचणी येऊ नयेत म्हणून जवळपास १४० बसची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु शहर बसस्थानकात एकही बस नसल्याने शांतता पहायला मिळाली.

Related Stories

डीसीसी बँकांमधील कर्जे माफ करण्याचा विचार

Amit Kulkarni

इस्पितळांना 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ठेवणे सक्तीचे

Amit Kulkarni

कर्नाटक जागतिक निविदाद्वारे दोन कोटी कोविड लसीचे डोस खरेदी करणार

Archana Banage

मुख्यमंत्री बनण्याची घाई नाही : शिवकुमार

Amit Kulkarni

बहरेनहून कर्नाटकासाठी आले ऑक्सिजनचे कंटेनर्स

Amit Kulkarni

मस्की: भाजपचे उमेदवार प्रतापगौडा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Archana Banage