Tarun Bharat

बहाद्दरवाडी क्रॉसवर भव्य वासरू-रेडकू प्रदर्शन

पशुपालकांनी वासरासह उपस्थित राहण्याचे आवाहन, पशुसंगोपन खात्याचा उपक्रम

Advertisements

प्रतिनिधी/बेळगाव

पशुपालकांच्या घरी जातीवंत जनावरांची पैदास व्हावी या दृष्टीकोनातून पशुसंगोपन खात्यामार्फत गुरूवार दि. 10 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत बहाद्दरवाडी क्रॉस येथे भव्य वासरू-रेडकू प्रदर्शन आयोजित केले आहे. पाfरसरातील पशुपालक शेतकर्‍यांनी आपल्या वासरासह उपस्थित रहावे असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे.

जातीवंत गायी म्हशींच्या मादी वासरांचे शास्त्रीय संगोपनाला प्रोlसाहन देण्यासाठी हे प्रदर्शन भरवले जात आहे. यावेळी जातीवंत, आरोग्यवंत व सदृढ वासरांचे तज्ञ पशुवैद्यकीयांकडून पाfरक्षण करून निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या संकरीत आणि देशी गायींच्या मालकांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रमाणपत्र देवून गौरविले जाणार आहे.

वासरांचे आरोग्य उत्तम रहावे याकाfरता प्रदर्शनात सहभागी होणार्‍या वासरांना जंत नाशक आणि टॉनिकची औषधे मोफत दिली जाणार आहे. अलिकडे पशुपालन करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. यांना प्रोlसाहन देण्यासाठी हा उपक्रम खात्याने राबविला आहे.

Related Stories

होनगा येथे कलमेश्वर मंदिरात चोरी

Patil_p

जय भवानी युवक मंडळातर्फे जगदीश पाटील याला शुभेच्छा

Amit Kulkarni

हिमस्खलनानंतर 5 नौसैनिक बेपत्ता

Patil_p

कर्नाटकातील अफगाणांना गृहमंत्र्यांनी दिले मदतीचे आश्वासन

Abhijeet Shinde

“मला २५०० कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर”; भाजपच्या माजी मंत्र्याचे वक्तव्य

Abhijeet Shinde

हिरण्यकेशी नदीची जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!