Tarun Bharat

बांगलादेशचे लंकेला 258 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था/ ढाका

रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने लंकेला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिले. बांगलादेशने 50 षटकांत 6 बाद 257 धावा जमविल्या. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी लंकेने 16 षटकांत 2 बाद 73 धावा जमविल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या डावात कर्णधार तमीम इक्बाल, मुश्फिकुर रहीम आणि मेहमूदुल्ला यांनी शानदार अर्धशतके झळकविली. बांगलादेशच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. सलामीचा दास दुसऱयाच षटकांत खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. शकीब अल हसनने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. तमीम इक्बाल आणि रहीम यांनी तिसऱया गडय़ासाठी 56 धावांची भर घातली. तमीम इक्बालने 70 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावा जमविल्या. मोहम्मद मिथुन खाते उघडण्यापूर्वी पायचीत झाला. बांगलादेशची स्थिती यावेळी 23 षटकांत 4 बाद 99 अशी होती.

मुश्फिकुर रहीम आणि मेहमूदुल्ला यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 109 धावांची भागिदारी केली. रहीमने 87 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 84 तर मेहमुदुल्लाने 76 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 54 धावा जमविल्या. हुसेन 3 चौकारांसह 27 तर सैफउद्दीन 2 चौकारांसह 13 धावांवर नाबाद राहिले. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे धनंजय डिसिल्वाने 3 तर चमिरा, गुणतिलका आणि संदकन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लंकेच्या डावाला डी गुणतिलका आणि कर्णधार कुशल परेरा यांनी सावध सुरूवात करून देताना 30 धावांची भागिदारी केली. पाचव्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने गुणतिलकाला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 5 चौकारांसह 21 धावा जमविल्या. मुस्तफिजुर रेहमानने निसांकाला झेलबाद केले. त्याने 1 चौकारांसह 8 धावा जमविल्या. 16 षटकांत लंकेने 2 बाद 73 धावापर्यंत मजल मारली होती.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश 50 षटकांत 6 बाद 257 (तमीम इक्बाल 52, शकीब अल हसन 15, मुश्फिकुर रहीम 84, मेहमुदुल्ला 54, आतिफ हुसेन नाबाद 27, सैफउद्दीन नाबाद 13, धनंजय डिसिल्वा 3-45, चमिरा 1-39, गुणतिलका 1-5, संदकन 1-55). लंका 16 षटकांत 2 बाद 73 (डी गुणतिलका 21, निसांका 8, मेहदी हसन मिराज 1-11, रेहमान 1-9).

Related Stories

गुजरात जायंट्स, यूपी योद्धा संघ विजयी

Amit Kulkarni

मल्लांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वप्न पहावे

datta jadhav

भारतीय महिला फुटबॉल संघाचा ब्राझीलविरुद्ध सामना

Patil_p

आजपासून आयपीएलची ‘लस’

Amit Kulkarni

मुष्टीयुद्ध प्रमुख प्रशिक्षकपदी कुट्टाप्पा

Patil_p

लंकेचा मलिंगा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p