Tarun Bharat

बांगलादेशच्या फलंदाज प्रशिक्षकपदी सिडॉन्स

Advertisements

ढाका :  बांगलादेश क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी जेमी सिडॉन्स यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बांगलादेश क्रिकेट मंडळाने गुरूवारी केली आहे. यापूर्वी ऍश्वेल प्रिन्स बांगलादेशचे फलंदाज प्रशिक्षक होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक दिवसामध्ये बांगलादेश क्रिकेट मंडळाने सिडॉन्स यांची या पदावर नियुक्ती केली आहे. ऍश्वेल प्रिन्स यांनी काही घरगुती कौटुंबिक समस्येमुळे आपल्या फलंदाज प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 2007 ते 2011 या कालावधीत सिडॉन्स हे बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. गेल्यावर्षीच्या मे महिन्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने पहिल्यांदाच हा नवा करार केला आहे. लवकरच बांगलादेश संघासाठी गोलंदाज प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. बांगलादेश आणि अफगाण यांच्यातील मालिकेला 23 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

25 वर्षांची ऍश बार्टी टेनिसमधून निवृत्त!

Patil_p

रणजी स्पर्धेची 87 वर्षांची परंपरा खंडित

Patil_p

युरो चषक स्पर्धेची बाद फेरी आजपासून

Amit Kulkarni

दुसऱया कसोटीतून शकीब अल हसन बाहेर

Patil_p

ल्हासुर्णेत महादेवाच्या पिंडीवर नागदेवता

Patil_p
error: Content is protected !!