Tarun Bharat

बांगलादेश क्रिकेट दौऱयासाठी अष्टपैलू हाफीजला विश्रांती

वृत्त संस्था/ लाहोर

पाकिस्तानचा क्रिकेट संघ 19 नोव्हेंबरपासून बांगलादेशच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने मंगळवारी 18 जणांचा पाकचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये अष्टपैलू मोहम्मद हाफीजला वगळण्यात आले आहे. या दौऱयासाठी इतर नवोदितांना संधी मिळावी यासाठी हाफीजला विश्रांती देण्याचा निर्णय पाक क्रिकेट निवड समितीने घेतला.

यजमान बांगलादेश-पाकिस्तान यांच्यातील टी-20 चे तीन सामने ढाका येथे 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला खेळविले जाणार आहेत. सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱया पाक संघातील सर्व खेळाडू या आगामी मालिकेसाठी कायम ठेवले असून मोहम्मद हाफीजला वगळण्यात आले आहे. पाक संघामध्ये इफ्तिकार अहमद, हैदर अली आणि खुशदील शहा यांनाही संधी दिली आहे.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर पाक-बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी पाक संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. टी-20 मालिकेसाठी पाकचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपविण्यात आले असून शदाब खान उपकर्णधार आहे. उभय संघातील पहिली कसोटी 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चित्तगावमध्ये तर दुसरी कसोटी 4 ते 8 डिसेंबर दरम्यान ढाक्यात खेळविली जाणार आहे. पाक संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), असिफ अली, फक्र झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, हसन अली, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम, खुशदील शहा, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम (ज्युनियर), सर्फराज अहमद, शाहिन आफ्रिदी, शहनवाज देहानी, शोएब मलिक, उस्मान कादीर.

Related Stories

पाकिस्तान-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून

Amit Kulkarni

सचिन सिवाच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

चौरंगी जिम्नॅस्टिक स्पर्धा टोकियोत

Omkar B

आरसीबीला चेन्नईकडूनही पराभवाचा शॉक

Patil_p

रामकुमार रामनाथन पराभूत

Patil_p

भारताचा एकतर्फी विजय

Amit Kulkarni