Tarun Bharat

बांगलादेश संघ पाकमध्ये दाखल

वृत्तसंस्था / लाहोर :

यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी बांगलादेश क्रिकेट संघाचे बुधवारी रात्री येथे आगमन झाले. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

 पाकमध्ये कसोटीत मालिका खेळण्यास बांगलादेश क्रिकेट मंडळाने सुरक्षेच्या समस्येमुळे नकार दिला होता. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने केवळ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्याची तयारी दर्शविली. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी दुबई पाक क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी आणि बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमूल हसन यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर ही मालिका निश्चित झ्घाली. बांगलादेश आणि पाक यांच्यातील या मालिकेतील सर्व म्हणजे तीन सामने लाहोरमध्ये खेळविले जातील. पहिला सामना शुक्रवारी, दुसरा  शनिवारी तर तिसरा सोमवारी होणार आहे. पीसीबीने या मालिकेवेळी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

सानिया मिर्झा-झेंग यांचे आव्हान समाप्त

Patil_p

दुबई टेनिस स्पर्धेत क्रेसिकोव्हा विजेती

Patil_p

भारताच्या दीक्षा डागरला मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक

datta jadhav

लीसेस्टर सिटीकडे पहिल्यांदाच एफए चषक

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 118 धावात खुर्दा

Patil_p

पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द

Patil_p