Tarun Bharat

बांग्लादेश दौरा ; नरेंद्र मोदींचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सत्कार


ढाका / ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजापासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौर्‍यावर आहेत. बांगलादेशाच्या स्वातंत्रदिनानिमित्त होणार्‍या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास विशेष विमानाने ढाकाकडे रवाना झाले होते. त्यानंतर त्यांचे विशेष विमान हे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ढाका येथील हजरत शहा जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. त्यांचे स्वागत बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले.

यावेळी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. ढाका येथील विमानतळावरुन मोदी यांनी बांगलादेश येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या व्हिजिटर बुकमध्ये संदेश लिहिला. यासोबतच एक रोप देखील लावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 मार्च रोजी सतखिरामधील श्यामनगर येथे जाऊन ईश्वरपुरी गावातील श्री श्री जसोरेश्चरी काली मंदिराला भेट देत पुजाअर्चा करतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बांगलादेशाच्या पंतप्रधान हसीना यांच्या तुंगिपारा गावी जाऊन तेथील बंगबंधु मुजीबुर रहमान स्मारकाला भेट देतील आण‍ि तेथे एक रोप लावणार आहेत.

Related Stories

मला गाडीने नको, विमानाने न्या; नाहीतर…

datta jadhav

उदय सामंत हल्ला प्रकरण; शिवसेना शहरप्रमुखासह 6 जणांना अटक

datta jadhav

30 किलो हेरॉईनसह 8 पाकिस्तानी नागरिकांची बोट पकडली

Tousif Mujawar

शाळा सुरू न करणे धोक्याचे

Patil_p

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

prashant_c

5 हजार वर्षे जुन्या मद्यालयाचा शोध

Amit Kulkarni