Tarun Bharat

बांदा पोलिसांचे दारू कारवाई मोहीम

तीन ठिकाणच्या कारवाईत 29 हजारची दारू जप्त : ‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर कारवाई सत्र

प्रतिनिधी / बांदा:

संचारबंदी असतानाही गोवा बनावटीची अवैध वाहतूक करणाऱया विरोधात बांदा पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे बांदा पोलिसांनी तीन वेगवेगळय़ा कारवाईत 28 हजार 800 रुपयांच्या दारुसह एकूण 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पहिल्या कारवाईत संशयित जावेद पिरसाब शेख (38, रा. मोरडोंगरी, सावंतवाडी) व जामन्ना बसप्पा गुलामणी (28, रा. माजगाव, भटवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यात 83 हजार रुपयांच्या नवीन ऍक्टिव्हा गाडीसह तीन हजार 900 रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई डेगवे स्थापेश्वर मंदिरानजीक हेड कॉन्स्टेबल दिलीप धुरी व धनंजय गोळे यांनी केली.

दुसऱया कारवाईत तीन हजार 122 रुपयांची दारू जप्त केली. यात गोवा बनावटीच्या मॅकडॉलच्या 180 मिलीच्या 18 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. याप्रकरणी धीरज जगन्नाथ गाडेकर (23, रा. करवीर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा हेड कॉन्स्टेबल दिलीप धुरी व धनंजय गोळे यांनी केली.

तिसऱया कारवाईत कमांड थ्री एक्स रमच्या 144 बाटल्या, रॉयल कोकोनट फेनीच्या 48 बाटल्या व काजू फेणीच्या एक लिटरच्या 15 बाटल्या असा एकूण 21 हजार 780 रुपयांची दारू जप्त केली. या दारू वाहतूकप्रकरणी हर्ष शिवकुमार जयस्वाल (22) व विष्णू लक्ष्मण नाईक (24, दोघेही रा. माजगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. दारू वाहतुकीसाठी वापरलेली 50 हजार रुपयांची ग्राझिया (एमएच 07 एके 4356) मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सकाळी 6.30 वाजता इन्सुली चर्चनजीक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार व महेश भोई यांनी केली.

‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर कारवाई तीव्र

 जिल्हय़ात गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा दारू वाहतूक संचारबंदीत सुरू असल्याची बातमी ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने दारुची बेकायदा वाहतूक करणाऱयाविरोधात कारवाई सत्र सुरू केले. याबाबत नागरिकांतून कौतुक होत आहे.

Related Stories

जिह्यात एसटीच्या फेऱया वाढल्या

Patil_p

वेंगुर्लेत नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर…पहा काय आहे निकाल ?

Anuja Kudatarkar

‘वारसा हक्क’ डावललेल्या नियुक्त्या रद्द करा!

NIKHIL_N

सिंधुदुर्गातील 15 हजार शेतकरी कर्जातच

NIKHIL_N

जिह्यात पाऊण लाख क्वॉरंटाईन्सची व्यवस्था

Patil_p

सेवानिवृत्त शिक्षकाकडून ‘जनता जनार्दना’ची सेवा

NIKHIL_N