Tarun Bharat

बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणंच्या विरोधात 8 जानेवारी रोजी देशभरातील कामगार देशव्यापी संपात सहभागी झाले. या संपास पाठींबा म्हणून आज गुरूवारी देशातील बांधकाम कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून सातारा जिह्यातील बांधकाम कामगारांनी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे अध्यक्ष माणिक अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढला होता.

सातारा जिल्हयात बांधकाम क्षेत्र विकसित होत आहे. व त्यामध्ये जिल्हयातील जेमतेम 8 ते 10 हजार कामागार नोंदीत झाले आहेत. बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम अनेक कारणे देवून 6 महिनेपेक्षा जास्त काळ बंद आहे. बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी प्रकिया सुलभ नाही तसेच नवीन नोंदणी त्वरीत मिळावी. एजंटद्वारा बोगस नोंदणीस आळा घालावा. कामगार कल्याण मंडळाच्या नोंदणी कार्यालयास पुरेसे स्वतंत्र व पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करावे. बांधकाम परवानगी देताना वसूल केला जाणारा सेस (बांधकाम कर) सक्तीने वसूल करून मंडळास आर्थिक सक्षम करावे. नोंदीत कामगारांच्या विविध लाभाच्या थकीत रक्कमा त्वरीत बॅक खात्यात जमा कराव्यात.

तसेच अपघात व मृत्यू नंतरच्या लाभाच्या थकीत रक्कम थेट जमा करण्यात याव्या. कामगारांच्या घराची प्रकरणे त्वरीत मंजूर कारावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चात मोठया संख्येने बांधकाम कामगार पुरूष व महिला सहभागी झाल्या होत्या. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी नारायण भोंडवे, आनंदी अवघडे, सचिन शेळके, अमर राजे, महादेव सुतार, आयाज आतार, संतोष पैठणकर, विवेक सुतार, विवेक शिर्के, रवि सुतार, दत्ता राऊत उपस्थित होते.

Related Stories

‘सातारा स्वाभिमान हाच साम्राज्याचा अभिमान’

Patil_p

राहत कोरोना केअर सेंटरचा जैविक कचरा रस्त्यावर

Patil_p

सातारा : सह्याद्रीची जैवविविधता समृद्ध

datta jadhav

कर्जमाफीसंदर्भात मीच सुप्रिम कोर्ट

Patil_p

पाटण प्रांत यांनी तारळे परिसरात अवैध वाळू साठ्यावर मारले छापे

Archana Banage

साताऱ्यात २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलवणार

Archana Banage
error: Content is protected !!