Tarun Bharat

बांधकाम मटेरियल तपासणीसाठी अभियंत्याने घेतली ऑनलाईन लाच

प्रतिनिधी / सोलापूर

बांधकाम मटेरियल तपासणी करुन देण्यासाठी 993 रुपयांची ऑनलाईन लाच स्वीकारल्याबद्दल कनिष्ठ अभियंत्यासह उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. दक्षता जनजागृती सप्ताहातच लाचेच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेतील उपअभियंता शिवराम जनार्दन केत (वय 49, रा. दक्षिण कसबा, शिंदे चौक) व कनिष्ठ अभियंता सुवर्णा शिवाजी सगर (वय 32, रा. प्रभा हाईटस, काळी मशीदजवळ, उत्तर कसबा) अशी अटक करण्यात आलेल्या अभियंत्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचे बांधकाम मटेरियल तपासणी करुन घ्यावयाचे होते, त्याकरीता ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था येथे गेले असता तेथील कनिष्ठ अभियंता सगर व उपअभियंता केत यांनी 6,500 रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. सदरची रक्कम शासकिय फी पेक्षा जास्त होत असल्याने तक्रारदारांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 रोजी पडताळणी केली. 6500 रुपयांऐवजी  तडजोडीअंती ती रक्कम 5,000 रुपये करण्यास उपअभियंता केत यांनी संमती दिली. त्यापैकी शासकीय तपासणी फी म्हणून 4007 रुपये व उर्वरीत 993 रुपये लाच म्हणून ऑनलाईन स्वीकारली. त्यावेळी दोघांना पथकाने जेरबंद केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस कर्मचारी बिराजदार, अर्चना स्वामी, श्रीराम घुगे, उमेश पवार यांनी केली.

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात शनिवारपासून संपूर्ण लॉकडाऊन !

Archana Banage

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासावर भर देणार – जिल्हाधिकारी

Archana Banage

सोलापूर : माढ्यात कोविड केअर सेंटरची कमी

Archana Banage

सोलापुरात नवे 31 पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाने घेतला 21 वा बळी

Archana Banage

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला वेबिनावर संवाद

Archana Banage

कर्मचारी घोटाळेबाजांना धडा शिकवणार

prashant_c