Tarun Bharat

बांबवडे शाखेत 1 कोटी 16 लाखांची वीजबिले थकीत

प्रतिनिधी / कोल्हापूर

महावितरणच्या शाहुवाडी उपविभागातील बांबवडे शाखा कार्यक्षेत्रातील 40 गावे व वाडÎांतील 5 हजार 462 वीज ग्राहकांनी 1 कोटी 16 लाख रुपयांचे वीज बिल थकविले आहे. वीज ग्राहकांनी वीज पुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीज बिल भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

बांबवडे शाखेतील 5 हजार 96 घरगुती ग्राहकांकडे 83 लाख 65 हजार, 288 वाणिज्य ग्राहकांकडे 17 लाख 41 हजार तर 78 औद्योगिक ग्राहकांकडे 14 लाख 92 हजार रुपयांची थकबाकी आहे. बांबवडे गावातील 789 वीज ग्राहकांनी सर्वाधिक 34 लाख 34 हजार, डोणोली गावातील 385 वीज ग्राहकांनी 10 लाख 34 हजार, साळशी गावातील 405 वीज ग्राहकांनी 7 लाख 53 हजार रुपयांचे वीज बिल थकविले आहे. 19 वीज ग्राहकांकडे 25 हजारांहुन अधिक तर 8 वीज ग्राहकांकडे 50 हजारांहुन अधिक वीज बिल थकबाकी आहे.

महावितरणकडून वीज बिलांची थकबाकी वसुली करण्याची मोहिम गतिमान करण्यात आली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी वीज बिल वसुलीकामी हयगय करणाऱया कर्मचाऱयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

‘आशां’ ना एक हजार प्रोत्साहन भत्ता

Archana Banage

खाटांगळेत रेशन धान्य वाटपात भ्रष्टाचार

Archana Banage

दहावी, बारावी परीक्षेबाबत संभ्रमावस्था

Archana Banage

कोल्हापुरात कनार्टकी सरकारचा निषेध

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात २४ तासात १७ मृत्यू ५९४ नवे रुग्ण

Archana Banage

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची आज देशभरात आंदोलन; महाराष्ट्रात ही निदर्शने

Abhijeet Khandekar