Tarun Bharat

बागणीत मृत बिबट्याचे पिल्लू सापडल्याने खळबळ

प्रतिनिधी / बागणी

सांगलीतील बागणी येथील काकाचीवाडी-रोझावाडी रस्त्यालगत माळीमळाबिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत सापडल्याने भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगेश मंत्री यांच्या शेतात दोन ते तीन महिन्याचे हे बिबट्याचे पिल्लू सापडले आहे.

वन अधिकारी अमोल साठे व विजय मदने यांनी हे पिल्लू पाहून खात्री केली. मंगेश मंत्री यांचे शेत सतीश शेटे यांच्याकडे कसण्यासाठी आहे. त्यांचा कामगार उसाला पाणी पाजत असताना त्या कामगारास हे पिल्लू दिसले. त्याने मालक सतीश शेटे व सर्प मित्र व प्राणीमित्र मुरलीधर बामणे यांना कळवले. त्यांनी वन विभागास माहिती दिली. त्यानंतर अधिकारी वर्गाने पंचनामा केला. भटकल्याने किंवा किरकोळ दुखापतीमुळे हे पिल्लू या भागात आले असल्याची शंका यावेळी त्यांनी व्यक्त केली. भागात बिबट्याची पिल्ले किंवा बिबट्याचा वावर देखील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी वर्गात व मजुरांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

मंत्री मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्या अटकेचे आदेश; किरीट सोमय्यांचा आरोप

Archana Banage

कोल्हापूर : घरफाळा घोटाळय़ावरून महापालिकेत खंडाजंगी

Archana Banage

कमानी हौद कारंजे बंदच

Patil_p

विलासकाकांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Patil_p

भाजपा निष्ठा अन् पक्षवाढ आमदार खाडेंच्या पथ्यावर

Archana Banage

”सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाचा थयथयाट”

Archana Banage