वार्ताहर / बागणी
बागणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे याचे प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी आय एस ओ टीमचे पुणे येथील सदस्य गुरुवार २१ जानेवारी रोजी १२ वाजता शाळेत येणार आहेत अशी माहिती मुख्याध्यापक वाय. डी. केसरे यांनी दिली.
बागणी शाळेचा कायापालट करणारा अवलिया म्हणजे मुख्याध्यापक वाय. डी. केसरे सर. सरांनी आपल्या कामातून शाळेमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून जिद्द, चिकाटी, कष्टाच्या जोरावर शाळेची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी शाळेचे मुख्याध्यापक पद स्वीकारले आहे. तेव्हापासून शाळेचा कायापालट झाला आहे. या मानांकनामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. ग्रामस्थ व पालक वर्गातून सरांचे व सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

