Tarun Bharat

बागलकोट येथे ट्रक चोरटय़ास अटक

सुमारे 400 पोती साखर जप्त : विजापूर-बागलकोट पोलिसांची कारवाई

वार्ताहर / विजापूर

विजापूर पोलिसांनी ट्रक चोरटय़ास अटक करून त्याच्याकडून ट्रक व 400 पोती साखर जप्त केली असून याची किंमत सुमारे 20 लाख रुपये इतकी आहे. उमेश श्रीशैल टकळ्ळकी (वय 21, यकुंडी, जि. विजापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रविवार 29 रोजी बागलकोट व विजापूर पोलिसांनी ही कारवाई केली. उमेशने राष्ट्रीय महामार्ग 50 वरून हा ट्रक चोरला होता.

याबाबत समजलेली माहिती अशी, रविवारी राष्ट्रीय महामार्ग 50 वरून चालक ट्रकमधून 50 किलो वजनाची 400 पोती साखर घेऊन जात होता. दरम्यान पेट्रोल घालण्यासाठी हा ट्रक नाडगौडा पेट्रोल पंपासमोर उभा होता. त्यावेळी उमेशने सदर ट्रक पळविला. तेथून त्याने हा ट्रक लोकापूर येथे घेऊन जात येथे साखर उतरवून लपवून ठेवली. त्यानंतर गद्दनकेरी क्रॉसजवळील सीमीकेरी गावानजीकच्या रस्त्यावर ट्रक उभा केला होता. त्यावेळी बागलकोट ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय टी. बी. निलगार, एस. बी. अजूर, पीएसआय एस. एस. माळे, संजू बनपट्टी, महेश सालिकेरी आदी गस्त घालत होते. यावेळी त्यांना सदर ट्रक आढळून आला. त्यानंतर त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता उमेश ट्रकमध्ये आढळून आला.

त्याची चौकशी केली असता उमेशने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याची अधिक चौकशी करण्यासाठी स्थानकात घेऊन जाण्यात आले. तेथे उमेशला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हा ट्रक आपण विजापूर राष्ट्रीय महामार्ग 50 वरून चोरी केला असून ट्रकमधील साखरेची पोती लोकापूर येथे लपविल्याचे सांगितले. त्यानंतर बागलकोट पोलिसांनी याची माहिती विजापूर पोलिसांना दिली. यानंतर विजापूर पोलिसांनी लोकापूर येथे पोहोचून उमेश व साखरेची पोती जप्त केली. या घटनेची नोंद विजापूर पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

खानापूरमधील ‘त्या’ शाळकरी मुलांच्या मृत्यूने हळहळ

Amit Kulkarni

नव्या शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

Amit Kulkarni

पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी सुरूच

Amit Kulkarni

गीता मनोहर हलगेकर यांना विविध संघटनांचा पाठिंबा

Amit Kulkarni

बेळगावात बॅण्डवादनाने झाले कोरोना लसींचे स्वागत

Patil_p

होय शिवराय बेळगावला आले होतेच…

Patil_p