Tarun Bharat

बागायतच्या अनुदानाने चिंच उत्पादनात वाढ

71 हेक्टर क्षेत्रात लागवड : रायबाग तालुक्मयात तब्बल 25 हेक्टर क्षेत्रात चिंच लागवड

प्रतिनिधी /बेळगाव

बागायत खात्याच्या अनुदानाचा फायदा घेत चिंचेची शेती करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अलिकडच्या काही वर्षांत चिंच उत्पादनात वाढ झाली आहे. यंदा जिल्हय़ात 71.33 हेक्टर क्षेत्रात चिंचेची लागवड झाली आहे. त्यामुळे चिंचदेखील शेतकऱयांचे मुख्य पीक म्हणून पुढे येत आहे.

जिल्हय़ातील अथणी, बेळगाव, सौंदत्ती, कित्तूर, चिकोडी, हुक्केरी, रामदुर्ग, मुडलगी आदी तालुक्मयात चिंचेचे उत्पादन घेतले जाते. विशेषतः सर्वाधिक रायबाग तालुक्मयात तब्बल 25 हेक्टर क्षेत्रात चिंच लागवड केली गेली आहे. खाद्य पदार्थ, स्वयंपाक आणि औषधे बनविण्यासाठी चिंचेचा वापर होतो. त्यामुळे मागणी देखील वाढली आहे. पूर्वी शेतात नैसर्गिकपणे पडून झाडे तयार व्हायची. मात्र अलिकडे चिंचेची शेती करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजीकच उत्पादनात वाढ झाली आहे.

कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणारे बागायती पीक म्हणून चिंचेकडे पाहिले जात आहे. एकदा लागवड झाली की साधारण 25 ते 30 वर्षे उत्पादन घेता येते. शिवाय पडीक जमिनीतदेखील उत्पादन होत असल्याने शेतकऱयांचा कलदेखील चिंच लागवडीकडे आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत पाण्याची गरज असते. नंतर पावसाच्या पाण्यावर झाडांची वाढ होते.

शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देणारे पीक

चिंच लागवडीसाठी नरेगा योजनेंतर्गत बागायत शेतकऱयांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे चिंच लागवड करणाऱयांची संख्या वाढली आहे. पडीक जमिनीत आणि कोणत्याही वातावरणात चिंचेच्या झाडांची जोमाने वाढ होते. त्यामुळे बागायत शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देणारे पीक म्हणून चिंच पुढे येत आहे.

महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)

जिल्हय़ातील चिंचेची लागवड

तालुकेचिंचेची लागवड (हेक्टरमध्ये)
रायबाग25.4 हेक्टर
अथणी21
बेळगाव12.9
सौंदत्ती6.29
कित्तूर1.96
चिकोडी1.64
हुक्केरी0.54
रामदुर्ग0.26
मुडलगी1
एकूण70.99

Related Stories

पुणे-बेंगळूर महामार्गाचा प्रवास धोकादायक

Patil_p

मण्णूर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नाईट रायडर्स विजेता

Patil_p

पोलिसांवर हल्ला करणाऱया दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालयाचा बदलणार ‘लूक’..!

Rohit Salunke

वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या अन्नपुरवठय़ात अळय़ा, किडे

Amit Kulkarni

सोमवारी रुग्णसंख्या शून्यावर

Amit Kulkarni