Tarun Bharat

बाची येथील शाळेसाठी स्वयंपाक खोली, शेड मंजूर करण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

बाची येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष करून स्वयंपाक करण्यासाठी खोली नाही तर बसून जेवण्यासाठी शेड नाही. त्यामुळे शाळेला तातडीने स्वयंपाक खोली व शेड उभारणी करून द्यावी, अशी मागणी बाची ग्रामस्थांनी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाची येथील मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतो. शेकडो मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांना जेवणासाठी शेड नसल्याने उन्हात व पावसात बाहेरच जेवण करावे लागत आहे. याचबरोबर स्वयंपाक बनविण्यासाठी खोली नसल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणी वर्गखाली व स्वयंपाक खोली बांधून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांना निवेदन दिले. यावेळी ता.पं. सदस्य सुनील अष्टेकर, एल. के. गावडे, लक्ष्मण गावडे, महादेव गुंजीकर, भाऊ गुंजीकर, केदारी जाधव, मधू मोदगेकरसह मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटक: राज्यात दररोज ५० हजार कोरोना चाचण्या : मंत्री सुधाकर

Archana Banage

बुडाच्या समुदाय भवन उभारणीचे काम सुरू

Amit Kulkarni

सिव्हिलमध्ये 20 जण आयसीयुमध्ये

Patil_p

पिरनवाडीचा 22 पासून उरूस

Amit Kulkarni

पोलीस कॉन्स्टेबलचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p

नगर परिषद, नगरपंचायतींच्या आरक्षणावरील स्थगिती मागे

Patil_p