Tarun Bharat

बाची येथे गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

बाची (ता. बेळगाव) येथे गांजा विकणाऱया एका तरुणाला बुधवारी अटक करण्यात आली आहे. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्याच्या जवळून 1 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

गजानन प्रकाश गुंजीकर (वय 24, रा. बाची, ता. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. 1 किलो 400 ग्रॅम गांजा व एक मोबाईल संच जप्त करण्यात आला असून हा साठा त्याने विक्रीसाठी मागविला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.

बाची येथे गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून गजाननला अटक केली. निळय़ा कॅरीबॅगमध्ये त्याने गांजा ठेवला होता. तो जप्त करुन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याच्यावर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कर्नाटकात प्रथमच डी लायसन्स फुटबॉल प्रशिक्षणाला बेळगावात प्रारंभ

Amit Kulkarni

फांद्यांच्या विळख्यात अडकले पथदीप

Patil_p

उपमुख्यमंत्र्यांची सरकारी पॉलिटेक्निकला भेट

Patil_p

सरस्वती वाचनालयाचा आधारस्तंभ हरपला

Patil_p

जुन्या पिढीतील ज्येष्ठ प्रसूती व स्त्री रोग तज्ञ डॉ. देवयानी देशपांडे यांचे निधन

Tousif Mujawar

फोर्ट रोड येथे सिग्नलवर कोसळली झाडाची फांदी

Amit Kulkarni
error: Content is protected !!