Tarun Bharat

बाजरीचे दिवस

तीळ लावलेली बाजरीची भाकर संक्रातीला आवडीने खाल्ली जाते. बाजरी उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे खूप फायदेशीर ठरते. भाकरीव्यतिरिक्त काही भागात सूप, कटलेट्स, बाजरी खिचडी, बाजरी मेथी वडीदेखील बनवली जाते.

किफायतशीर असल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा गरीब लोकांसाठी बाजरी हे मुख्य अन्न जरी असले तरी सध्या विविध आजारांपासून सुटका मिळावी, म्हणून श्रीमंत लोकांना देखील आहारतज्ञांमार्फत बाजरी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. बाजरी तंतुमय पदार्थानी (फायबर) समृद्ध असल्यामुळे मधुमेह असणाऱयांसाठी उपयुक्त ठरते.

बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण गहु, मका, भात, ज्वारी इ. पिकापेक्षा जास्त असल्यामुळे आहारात बाजरीचा समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. बाजरी एक ग्लुटेनमुक्त अन्नधान्य असल्यामुळे ग्लुटेनची ऍलर्जी असलेल्या लोकांना बाजरी एक उत्तम पर्याय आहे.

बदलत्या वातावरणात तग धरून ठेवण्याची क्षमता व पौष्टिकपणा यामुळे धान्याबरोबर जनावरांना चारा देणाऱया बाजरीचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. बाजरीच्या उत्पादकतेच्या बाबतीत जगभरात भारत सर्वात पुढे आहे. कोरडवाहू परिस्थितीत तग धरण्याची क्षमता बाजरीमध्ये ज्वारीपेक्षा पण जास्त आहे म्हणून कमीत कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणीदेखील बाजरीची लागवड केली जाते.

भारतात अशी जमीन व वातावरण राजस्थानात आहे, जिथे सर्वात जास्त बाजरीची लागवड होते. राजस्थान पाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, हरियाना, उत्तर प्रदेश या राज्यात मोठय़ा प्रमाणात बाजरी पिकवली जाते. हिरव्या चाऱयासाठीदेखील बाजरीची लागवड केली जाते.

Related Stories

लोण्याचा गोळा

Patil_p

आरंभ प्रवेश पर्वाचा

tarunbharat

चायनिजपासून सावधान !

tarunbharat

नृत्यपूर्ण आविष्कार

Patil_p

सुरक्षेसाठी दक्षता घ्या

Patil_p

युवा वर्ग जागृत होतोय

Patil_p
error: Content is protected !!