Tarun Bharat

बाजारपेठेत मंगळवारी पुन्हा खरेदीसाठी उसळली गर्दी

प्रतिनिधी / बेळगाव

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बाजारपेठेतील गर्दी गेल्या काही दिवसांपासून कमी झाली होती. मात्र, अचानक मंगळवारी गर्दी उसळली. मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्थ्दी केली होती. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी सकाळी 10 नंतर पुन्हा दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

कोरोनाकाळात प्रत्येकाने नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र, हे नियम पायदळी तुडविण्याचा प्रकार वेळोवेळी दिसत आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि जाणकारांतून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. वास्तविक मंगळवारी दुकाने बंद असतात. मात्र, कोरोनाकाळातही बहुसंख्य दुकाने सकाळी सुरू होती. प्रत्येक ठिकाणी गर्दी दिसत होती. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी गर्दी दिसली. यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्मयता आहे.

ग्रामीण भागातून जनता सकाळीच खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात येत होती. त्यामुळे बाजारपेठेत काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती. पोलिसांनी काही ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मार्गांवर अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. दुसरे रेल्वेगेट येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे पाहायला मिळाले. अनेक गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे त्या गावांतील नागरिक खरेदीसाठी बेळगावकडेच येत होते. त्यामुळे मंगळवारी अधिक गर्दी झाली होती. पोलिसांनी अनेकांना अडवून त्यांच्यावर गुन्हे नोंदविले आहेत.

खडेबाजार परिसरात पोलिसांनी दिली अनेकांना समज

मंगळवारी सकाळपासूनच गर्दी दिसत होती. मात्र, पोलिसांनी खरेदीसाठी मुभा  दिली होती. त्याचा काही जण गैरफायदा घेत होते. त्यामुळे पोलीस व महापालिकेचे कर्मचारी हातामध्ये स्पिकर घेऊन दुकाने बंद करा तसेच जनतेने माघारी फिरावे, असे आवाहन करण्यात येत होते. यावेळी काही जणांची चौकशी करूनच त्यांना सोडले. विनाकारण फिरणाऱयांची वाहने जप्त करण्यात आली
आहेत.

Related Stories

अथणी येथील उपनोंदणी कार्यालयावर छापा

Amit Kulkarni

बेळगुंदी येथे हुतात्म्यांना अभिवादन

Tousif Mujawar

एक्सेस इलाईट हुबळी, साईराज हुबळी टायगर्स संघांची विजयी सलामी

Patil_p

राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत अरूण, लक्ष्मण, टीना यांची निवड

Amit Kulkarni

वादळी वाऱयामुळे शाळेच्या छतावरील कौले उडाली

Amit Kulkarni

कर्नाटक : पिण्याच्या पाण्याचा प्रकल्पासाठी जागतिक बँकेची मदत

Archana Banage