Tarun Bharat

बाजारपेठेत विविध दिनदर्शिका उपलब्ध

नववर्षाचे वेध : ठिकठिकाणी दिनदर्शिकांचे जणू प्रदर्शनच, 30 ते 50 रुपयेपर्यंत किंमती असल्याची माहिती

प्रतिनिधी / बेळगाव

बाजारपेठा विविध सण-समारंभांची चाहूल लावतात. दिवाळीचा सण होताच आता बाजारपेठेत नववर्षाच्या आगमनाची चाहूल देणाऱया दिनदर्शिकांनी स्थान मिळविले आहे. ठिकठिकाणी दिनदर्शिकांचे जणू प्रदर्शनच भरले असून यामुळे अवघ्या 40 दिवसांवर येऊन ठेपलेल्या 2021 या नववर्षाचे वेध लागले आहेत. बाजारपेठेत हे चित्र अधिकच स्पष्ट जाणवत असून विविध पुस्तकांच्या भांडारामध्ये तसेच छोटय़ा-मोठय़ा स्टॉलवर दिनदर्शिका पाहायला मिळत आहेत. यामुळे 2020 ला निरोप व 2021 या नववर्षाच्या स्वागताची चाहूल बाजारपेठेत लावलेल्या दिनदर्शिकांच्या विक्रीतून लागली आहे.

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असून डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी 2021 चे आगमन होणार आहे. मात्र नववर्षातील वारांची, तारखांची आणि सुटय़ांची माहिती घेण्यासाठी दिवाळी होताच दिनदर्शिकांची खरेदी सुरू झाली असल्याचे मत विक्रेत्यांमधून व्यक्त होत आहे. भाग्योदय, महालक्ष्मी, कालनिर्णय तसेच इंग्रजी, कन्नडमधील विविध दिनदर्शिका बाजारात उपलब्ध असून किंमती 30 ते 50 रुपयेपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली.

    दिनदर्शिकांसह दैनंदिनी, डायरी खरेदीकडे कल…

गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार या भागात दिनदर्शिका विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. परगावांहून येणाऱया नागरिकांकडून विविध साहित्यांच्या खरेदीबरोबरच दिनदर्शिका घेतल्या जात आहेत. मोबाईलच्या युगातही पंचांग तसेच राशीभविष्य आणि लेखी नोंदीच्या दृष्टिकोनातून दिनदर्शिकांचे महत्त्व टिकून असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. दिनदर्शिकांसह दैनंदिनी, हिशेब डायरी खरेदीकडे कल असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Stories

लॉकडाऊनच्या चर्चेमुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी

Patil_p

श्री समादेवीच्या वार्षिक जन्मोत्सवाला प्रारंभ

Patil_p

हुक्केरीत पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान

Omkar B

स्वखर्चाने केल्या गोडसे कॉलनीतील गटारी स्वच्छ

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ातील सर्व तालुके पूरग्रस्त

Patil_p

आनंदनगर नाला स्वच्छतेचे काम सुरू

Amit Kulkarni