Tarun Bharat

बाजारातील चार सत्रांच्या तेजीला विराम !

Advertisements

सेन्सेक्स 215 अंकांनी प्रभावीत – रिलायन्स नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारातील चार दिवसांच्या तेजीला अखेर शुक्रवारच्या सत्रात विराम मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या पतधारेण बैठकीतील निर्णय जाहीर केला असून व्याजदरात कोणताही बदल न करता व्याजदर कायम ठेवला आहे. परंतु सदरच्या निर्णयाअगोदरच दिग्गज कंपन्यांचे समभाग प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी तसेच स्टेट बँक यांचे समभाग घसरणीत राहिल्याने बाजार प्रभावीत झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 215.12 अंकांनी घसरुन निर्देशांक 54,277.72 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 56.40 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,238.20 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. 

चालू आठवडय़ात एकूण सत्रात शेवटच्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला आहे. अन्य दिवसांमध्ये नवा विक्रम नोंदवत बाजाराने आपली नवी उंची कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांपेक्षा अधिकने घसरले आहेत. तर यासोबत अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, टाटा स्टील, एचडीएफसी आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, भारतीय एअरटेल, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी व एनटीपीसीसह बजाज ऑटोचे समभाग तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे.

चढउताराचे वातावरण

देशातील बाजारातील निर्देशांकात चढउताराचे वातावरण राहिल्याने रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग सर्वाधिक अंकांनी घसरले आहेत. यासोबतच आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णय सादर करण्यात आल्यामुळे व दुसऱया बाजूला सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स व फ्यूचर समूहातील व्यवहारासह ऍमेझॉनच्या बाजूने निर्णय लागल्याने रिलायन्सचे समभाग मोठय़ा प्रमाणात घसरले आहेत. याच दोन घडामोडीवर बाजाराची संपूर्ण दिशा बदलून गेली असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे.

Related Stories

मारूती सुझुकीचा कर्नाटक बँकेसोबत करार

Patil_p

स्कोडा कुशाक 28 जूनला होणार दाखल

Patil_p

शेअर बाजार पुन्हा घसरणीसोबत बंद

Patil_p

विप्रोकडून ब्राझीलच्या फर्मची खरेदी

Patil_p

चढ-उताराच्या प्रवासात बाजार सावरला

Omkar B

मर्सीडीज-बेंझच्या कार्यकारी संचालकपदी व्यंकटेश कुलकर्णी

Patil_p
error: Content is protected !!