Tarun Bharat

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम

वृत्तसंस्था / मुंबई :

चालू आठवडय़ातील मुंबई शेअर बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर चौथ्या दिवशी गुरुवारी विराम लागला आहे. जागतिक पातळीवरील वेगाने झालेल्या विक्रीच्या प्रभावामुळे देशातील शेअर बाजारात पडझड झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बाजारात घसरणीचे सत्र राहिले आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक परिदृश्यासह निराशजनक आलेल्या अहवालामुळे जगभरातील गुंतवणूकदारांवर प्रभाव पडल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरानंतर बीएसई सेन्सेक्स 394.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,220.39 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 96.20 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,312.20 वर बंद झाला आहे. 

सेन्सेक्समध्ये दिवसभरात एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे दोन टक्क्मयांनी नुकसानीत राहिले आहेत. सोबत ऍक्सिस बँक, भारती एअरटेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टायटनचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसरीकडे एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवर ग्रिड कॉर्प आणि टाटा स्टीलचे समभाग मात्र नफ्यात राहिले आहेत.

आशियातील अन्य बाजारातील वातावरण नरमाईचे राहिल्याचा परिणाम भारतीय  शेअर बाजारावर झाल्याने बाजारात प्रारंभीपासूनच घसरणीचे सत्र राहिले आहे. जागतिक बाजारात अमेरिकेतील फेडरल रिझर्क्हच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात सावधानतेची भूमिका राहिल्याचा प्रभाव राहिला होता. तसेच अमेरिका व चीन यांच्यातील तणावामुळे आणि कोरोना संसर्गाचा नवीन क्षेत्रात होणाऱया प्रसाराचा परिणाम बाजारातील कामगिरीवर राहिल्याचा अंदाज बाजारातील तज्ञांनी मांडला आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनुसार अर्थव्यवस्थेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अनुमान नोंदवण्यासह अन्य बाबतीत असमर्थ राहिल्याने दुपारपर्यंत बाजारातील व्यवहारात तेजीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे मिळताच नफा कमाईच्या जोरावर ही तेजी टिकवण्यात शेअर बाजार अयशस्वी ठरल्याचे पहावयास मिळाले आहे.

चालू वित्त वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत 3.2 टक्क्मयांची घसरण नोंदवली जाणार असल्याचे संकेत जागतिक बँकेने दिले आहेत. तसेच आशियाई देशाच्या बाजारातही पडझड राहिल्याचा प्रभाव भारतीय बाजारावर राहिल्याचे दिसून आल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

इंडियाबुल्सने 874 कोटींची केली घर विक्री

Patil_p

म्युच्युअल फंडात दीड लाख कोटीची भर

Patil_p

78 टक्के ग्राहकांचे खर्चावर नियंत्रण

Patil_p

महिंद्रा आणि महिंद्राची ट्रक्टर विक्री वाढली

Patil_p

महिंद्रा ट्रक्टर्सच्या विक्रीत दुप्पट वाढ

Patil_p

सेबीकडून डिफॉल्टर्सची यादी सादर

Patil_p