Tarun Bharat

बाजारातील सप्ताहाचा प्रारंभ घसरणीसोबत

सेन्सेक्स 81.48  तर निफ्टी 12.30 अंकांनी घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

मागील आठवडय़ात शेअर बाजाराचा प्रवास चढउताराचा राहिला होता. रिलायन्स जिओमधील गुंतवणूक करण्यात जागतिक कंपन्यांनी मोठा हिस्सा प्राप्त केला होता. यामुळे देशातील शेअर बाजारातील समभाग वधारले होते. मात्र चालू  आठवडय़ातील पहिल्या सोमवारी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स सकाळी सुरु होताना 387.64 तर निफ्टी 69.65 अंकांनी वधारला होता. ही स्थिती किमान अर्धा तासापर्यंत राहिली होती. परंतु त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली आहे.

दिवसभरातील प्रवासानंतर शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 81.48  अंकांनी घसरुन निर्देशांक 31,561.22 वर बंद झाला आहे तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 12.30 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,239.20 वर बंद झाला आहे. दिग्गज  कंपन्यांमध्ये बीएसईमधील वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पहावयास मिळाले आहे. यात टाटा मोटर्स 5.86, मदर सुमी सिस्टम           4.68, मारुती 5.63, हिरो मोटो कॉर्प 6.15, टीक्हीएस मोटार 5.96 आणि बजाज ऑटोचे समभाग 5.79 टक्क्मयांनी वधारले आहेत.

बीएसईमधील जवळपास 49 टक्के कंपन्यांचे समभाग घसरले आहेत तर 39 कंपन्यांच्या समभागांनी वर्षभराचा उच्चांक पार केला आहे. 102 कंपन्यांचे समभाग मात्र निम्म्यावरच राहिल्याची नोंद करण्यात आली. 221 कंपन्यांच्या समभागांना अपर सर्किट आणि 256 कंपन्यांचे समभागांस लोअर सर्किट लागले होते.

जगभरातील विविध शेअर बाजारांमध्ये तेजीचा माहोल पहावयास मिळाला आहे. यात अमेरिका, चीनमधील शांघाय कम्पोसिटचा समभाग 0.40 टक्क्मयांनी वधारुन 11.72 अंकांच्या वरती पोहोचला होता. जागतिक शेअरबाजारातील स्थिती सुधारते आहे. दुसऱया बाजूला ऍपल आपला चीनमधील कारभार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. अन्य प्रकारे होणाऱया विदेशातील व्यवहारांवरती आगामी काळात बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

निर्यातीमध्ये सकारात्मक सुधारणा : मंत्री गोयल

Patil_p

गुजरातकडून ‘टेस्ला’ला जमिनीची ऑफर

Patil_p

एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni

प्राप्तिकर विभागाकडून 1.54 लाख कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर

Amit Kulkarni

लँडमार्क्स कार्सचा येणार आयपीओ

Patil_p

ऍमेझॉनची विविध व्यवसायातील गुंतवणूक 11400 कोटींवर

Omkar B